जेष्ठ साहित्यिक प्रा.ॠषीकेश कांबळे यांचा अहमदपुरात सत्कार.
जेष्ठ साहित्यिक प्रा.ॠषीकेश कांबळे यांचा अहमदपुरात सत्कार. ------------------------------------------------------------------------------- अहमदपूर/प्रतिनिधी आंबेडकर चळवळीचे मराठवाड्यातील अग्रगण्य नेते तथा जेष्ठ साहित्यिक प्रा.ॠषीकेश कांबळे यांचा अहमदपुरात नुकताच सत्कार करण्यात आला. थोर विचारवंत प्रा. ॠषीकेश कांबळे यांनी अहमदपूर येथे धावती भेट दिली असता येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी गुरुतुल्य असलेले प्रा.ऋषीकेश कांबळे यांचा सन्मान पुर्वक सत्कार केला. यावेळी विद्रोही कवी राजेंद्र कांबळे,बा.ह.वाघमारे , बाबासाहेब वाघमारे, गोविंदराव गिरी, उत्तम कांबळे, डॉ. सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, सेवा निवृत्त विस्तार अधिकारी नामदेव राठोड, राजू खंदाडे,विनय ढवळे,मुन्ना कांबळे, राजाराम पाटील, शिवाजी गायकवाड, पिराजी कांबळे,लखन गायकवाड,अजय भालेराव, मुकुंद वाघमारे यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.