कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश वाटप
कुंटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर कुटुंबाला शासनाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.या योजनेअंतर्गत आज अहमदपूर तालुक्यातील 5 महिलांना 20 हजार रुपयांचे धनादेश आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यामध्ये पेटकर ललीता बालाजी रा. अहमदपुर, दराडे शालुबाई श्रीकांत रा. व्होटाळा, चोले संगीता अंगद रा. अहमदपुर, मोरे शांता सतिश रा. महादेववाडी व सुर्यवंशी शोभा ज्ञानोबा रा.कुमठा (बु) यांचा समावेश आहे. याप्रसंगी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवानंद तात्या हेंगणे, जि.प. सदस्य माधव जाधव, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, राष्ट्रवादीचे ता. कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे फेरोजभाई शेख, पंचायत समिती सदस्य शाम पाटील आदी उपस्थित होते.