केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी.व अजय मिश्रा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.या मागणीसाठी किनगाव येथील बाजार पेठ कडकडीत बंद पाळण्यात आला.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी.व अजय मिश्रा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
या मागणीसाठी किनगाव येथील बाजार पेठ कडकडीत बंद पाळण्यात आला.

उत्तर प्रदेश मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी आंदोलक शेतकरी बांधवांना भरधाव वेगाने गाडीने चिरडून ठार केले त्यांच्या निषेधार्थ आज दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी किनगाव येथील बाजार पेठ बंद करून कडकडीत बंद पाळण्यात येऊन ,अजय मिश्रा यांच्या मुलावर जन्मठेप सुनावण्यात यावी व केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा अशी यासाठी किनगाव येथील बाजार पेठ कडकडीत बंद पाळण्यात आला. धनराज गिरी काँग्रेस, गणेश पांचाळ शिवसेना तालुका उपप्रमुख, संतोष आदटराव युवासेना तालुका उपप्रमुख, दिलदार शेख तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी, लक्ष्मण गुट्टे शिवसेना विभाग प्रमुख,मारोती बीराडे शिवसेना विभाग प्रमुख अंधोरी,बस्वराज शिलगिरे शिवसेना उपविभाग प्रमुख ,यानने गजानन उपविभा प्रमुख,शकील पठाण काँग्रेस,श्रीकांत मुंढे शिवसेना शाखा प्रमुख,गोविंद गुट्टे शिवसेना शाखा प्रमुख दगडवादी,आशिष स्वामी वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक,विजय सोळंके शिवसेना कार्यालय प्रमुख किनगाव,चांद मोमीन राष्ट्रवादी पार्टी,शुभम जाधव राष्ट्रवादी पार्टी,आरिफ देशमुख काँग्रेस,शुभम मुंढे शिवसेना,शादुल शेख राष्ट्रवादी, सह शिवसैनिक व कांग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे