महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने दिले जाणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार वैयक्तिक आणि संस्थेचे पुरस्कार जाहीर.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने दिले जाणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार वैयक्तिक आणि संस्थेचे पुरस्कार जाहीर मुंबई दि.12.06.2022 वीर शैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत ,साहित्यिक समाज प्रबोधन कार, समाज संघटक , समाजसेवक असलेल्या एका व्यक्तीला व यासाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेला महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने त्यांच्या जयंतीदिनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतो. दिनांक 13 रोजी या पुरस्काराचे उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या। प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आली आहे. त्यात 2016-2017 चा व्यक्ती ला असलेला पुरस्कार औरंगाबादचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांना तर संस्थेचा शिवा संघटना यांना, 2017 -2018 चा व्यक्तीला असलेला पुरस्कार नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अभय मनोहररा...