भारतीय समाजा मध्ये श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आचार्य गुरुराज स्वामी यांचे प्रतिपादन.
भारतीय समाजा मध्ये श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.
आचार्य गुरुराज स्वामी यांचे प्रतिपादन.
अहमदपूर दि. 0406 22 महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात जातीभेद निर्मूलन, आंतरजातीय विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन करा आणि समाजामध्ये श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे यासाठी मोठे प्रयत्न केले त्यांचा आदर्श समोर ठेवून तरुणांनी श्रमाला महत्व द्यावे असे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले.
दि. 4 रोजी ग्रामदैवत महादेव मंदिराच्या हेमाडपंती चौकटीच्या पूजन शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर मठ संस्थानचे मठाधिपती राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, मंदिर बांधकाम समितीचे ओमप्रकाश पुणे, केदारनाथ काडवादे, विनोद हिंगणे, राजकुमार कल्याणे, रामलिंग तत्तापूरे, अनिल कासनाळे, शिवकुमार उटगे सह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आचार्य गुरुराज स्वामी म्हणाले की, आज समाजामध्ये सर्व भौतिक सुख सुविधा असतानाही सामान्य माणूस बेचैन आहे. त्यामुळे समाजामध्ये सुख-शांती-समाधान निर्माण करायचे असल्यास विज्ञानाला अध्यात्माची जोड द्यावी असे आव्हान केले.
प्रारंभी राष्ट्रसंत परम पूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आचार्य गुरुराज स्वामी यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला .
यावेळी मंदिर बांधकाम समितीचे सदस्य ओम प्रकाश पुढे म्हणाले की महादेव मंदिर अहमदपुर शहराचे ग्रामदैवत असून याच्या बांधकामासाठी शहरातील नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे जाहीर आव्हान त्यांनी केले.
प्रास्ताविक केदारनाथ काडवादे यांनी सूत्रसंचालन ओमकार पुणे यांनी तर आभार एडवोकेट किशोर कोरे यांनी मानले.
या सोहळ्याला उद्योजक शरण चवंडा ,नगरसेवक रविशंकर महाजन, नगरसेवक संदीप चौधरी ,नगरसेवक राहुल शिवपुजे, शरद शिवपुजे ,ईरनाथ तत्तापुरे ,राजकुमार पुणे सह महिला व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
टिप्पण्या