सरकारने त्यांच्या अधिकारातील मराठा समाजाच्या अन्य महत्वपूर्ण मागण्या तरी पूर्ण करा.छावा मराठा संघटनचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांची मागणी
*सरकारने त्यांच्या अधिकारातील मराठा समाजाच्या अन्य महत्वपूर्ण मागण्या तरी पूर्ण करा* -------------------------------------------------- छावा मराठा संघटनचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांची मागणी ------------------------------------------------- केज:- (दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी):- मराठा आरक्षण रद्द झाले हे मान्य आहे परंतु अन्य अनेक प्रलंबित मुद्यांना गति देने राज्य सरकार का हाती आहे.त्या बाबत ही राज्य सरकार उदासीन का?असा सवाल छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यानी उपस्थित केला आहे.मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालय ने रद्द केले आहे. आरक्षण मिळावे यासाठी पुढील काळातही निर्णायक लढा देण्याची तयारी विविध संघटनांनी सुरू केली आहे.आरक्षणचा लढा दीर्घकाळ चालण्याची शक्यता असली तरी अन्य अनेक मागण्या राज्य सरकार ला पूर्ण करने शक्य आहे त्या तातडीने पूर्ण कराव्या तशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी न्युज महाराष्ट्र टुडेशी बोलताना सांगितले. भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी ,कांग्रेस ,मनसे यासह सर्वोच्च राजकीय पक्षाचा मोहात न अडकत...