सरकारने त्यांच्या अधिकारातील मराठा समाजाच्या अन्य महत्वपूर्ण मागण्या तरी पूर्ण करा.छावा मराठा संघटनचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांची मागणी

*सरकारने त्यांच्या अधिकारातील मराठा समाजाच्या अन्य महत्वपूर्ण मागण्या तरी पूर्ण करा*
--------------------------------------------------
छावा मराठा संघटनचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांची मागणी
-------------------------------------------------
केज:- (दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी):- मराठा आरक्षण रद्द झाले हे मान्य आहे परंतु अन्य अनेक प्रलंबित मुद्यांना गति देने राज्य सरकार का हाती आहे.त्या बाबत ही राज्य सरकार उदासीन का?असा सवाल छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यानी उपस्थित केला आहे.मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालय ने रद्द केले आहे. आरक्षण मिळावे यासाठी पुढील काळातही निर्णायक लढा देण्याची तयारी विविध संघटनांनी सुरू केली आहे.आरक्षणचा लढा दीर्घकाळ चालण्याची शक्यता असली तरी अन्य अनेक मागण्या राज्य सरकार ला पूर्ण करने शक्य आहे त्या तातडीने पूर्ण कराव्या तशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी न्युज महाराष्ट्र टुडेशी बोलताना सांगितले. भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी ,कांग्रेस ,मनसे यासह सर्वोच्च राजकीय पक्षाचा मोहात न अडकता समाजाचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज व्हाव जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार रहा आहे आवाहनही शिवाजी दादा ठोंबरे यांनी केले आहे.

*मराठा समाजाच्या अशा आहेत प्रलंबित मागण्या.....*
1) मराठा तरुणानंवरील आंदोलन काळातील गुन्हे मागे घ्यावेत 2) उद्योग,व्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रास तात्काळ मदद करावी.3) मराठा विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावे.4) कै.अन्नासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 500 कोटी निधि द्यावा.5) 9 सप्टेंबर 2020 पूर्वी सर्व निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या 2185 मराठा उमेदवारांची विना विलंब नियुक्त्या द्याव्यात.6)अरबी समुद्रात छत्रपति शिवस्मारक विना विलंब करावे.7)सारथी संस्थेची स्वायत्तता स्वतंत्र ठेवण्यात यावी.7) तारा दूत प्रकल्प तात्काळ सुरू करावा .8)सारथी ची उद्दिष्टे व प्रकल्प याबाबत माहिती मराठा तरुणांना द्यावी.9)मराठा आंदोनातील हुतात्मा घरातील अनेक व्यक्तीला पात्रटेबअनुसार शासकीय सेवेत समावेश करावा. 
आशा विविध प्रकारच्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या सरकारने पूर्ण करून मराठा समाजाला योग्य न्याय द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा देणार असल्याचे प्रतिनिधी शी बोलताना शिवाजी ठोंबरे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे