अडचणीत असलेल्या एच आय व्हि बाधीत आनंदग्रामला केजच्या युवकांचा मदतीचा हात
अडचणीत असलेल्या एच आय व्हि बाधीत आनंदग्रामला केजच्या युवकांचा मदतीचा हात...
बीड:- दि-१४ रोजी बीड जिल्ह्यातील पाली येथील इन्फंट आॅफ इंडिया या संस्थेमधील ६२ HIV ग्रस्त बालकांवर सध्याच्या या कोरोनाच्या काळात बिकट परीस्थिती ओढावल्याची बातमी काल अरविंद थोरात यांनी वाचली.त्यानंतर लागलीच आनंदग्रामचे संस्थापक दत्ता बारगजे सरांशी बोलल्यावर,तेथील HIV ग्रस्त बालकांवर ओढवलेल्या परीस्थिती विषयी मित्रांशी चर्चा केली.
त्यानंतर लागलीच मनोज भैय्या टकले व मित्रपरीवार यांनी १३५०० रुपयांचा किराणा,संदिपराजे चाळक यांनी तांदुळ व सॅनिटायजरचा कॅन तर अमर भैय्या धपाटे यांनी हे सर्व घेऊन जाण्यासाठी स्वताची गाडी घेतली.
या सर्व युवकांनी आपापल्या परीने किराणा सामान,तांदुळ, भाजीपाला,अन्नधान्य,सॅनिटायजर घेऊन मदतीचा वाटा उचलला व हि मदत बीड ला पाली येथील इन्फंट आॅफ इंडिया येथे जाऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता बारगजे सर व तेथील मुलांकडे सुपुर्द केली.या अडचणीच्या काळात मदत पोहोच केली त्याबद्दल बारगजे सरांनी व तेथील लहान मोठ्या लेकरांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी त्याठिकाणी अरविंद थोरात,मनोज भैय्या टकले,संदिपराजे चाळक,अमर भैय्या धपाटे व आनंदग्रामचे संस्थापक अध्यक्ष दत्ता बारगजे सर व विद्यार्थी उपस्थित.
टिप्पण्या