पोस्ट्स

कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश वाटप

इमेज
कुंटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर कुटुंबाला शासनाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.या योजनेअंतर्गत आज अहमदपूर तालुक्यातील 5 महिलांना 20 हजार रुपयांचे धनादेश आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आले.  यामध्ये पेटकर ललीता बालाजी रा. अहमदपुर, दराडे शालुबाई श्रीकांत रा. व्होटाळा, चोले संगीता अंगद रा. अहमदपुर, मोरे शांता सतिश रा. महादेववाडी व सुर्यवंशी शोभा ज्ञानोबा रा.कुमठा (बु) यांचा समावेश आहे.  याप्रसंगी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवानंद तात्या हेंगणे, जि.प. सदस्य माधव जाधव, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, राष्ट्रवादीचे ता. कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे फेरोजभाई शेख, पंचायत समिती सदस्य शाम पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यअधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या माध्यामातून जनतेची दिशाभूल.पाणी प्रश्न लवकर न सुटल्यास तिरडी आंदोलन करणार- लक्ष्मण अलगुले

इमेज
मुख्यअधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या माध्यामातून जनतेची दिशाभूल. ===================== पाणी प्रश्न लवकर न सुटल्यास तिरडी आंदोलन करणार- लक्ष्मण अलगुले ======================       शहरामध्ये दर आठवड्याला एका वेळा नियमीत पाणी सोडणे व शहरातील पाईप लाईन मुळे व अतिवृष्टीमुळे गल्ली गल्लीत झालेले खड्डे तात्काळ दुरुस्ती करणे तसेच शहरात होणाऱ्या अस्वछतेमुळे व नाली अभावी डेंगु मलेरिया व इतर रोगराई होत असुन या गलथान कारभारावर तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात अन्यथा नगरपरिषदे समोर तिरडी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेनेचे शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले यांनी मुख्यअधिकारी यांना निवेदनातुन दिला आहे.       शहरवासी हे गेली ५० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असुन सन २०१७ साली मंजूर असलेली कायम स्वरूपी पाणी पुरवठा यो योजना आज तागायत संपुर्णताहः आमलात आलेली नसुन शहरातील जनतेला नियमीय व सुरळीत पाणी येत नसल्यामुळे शहरातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . गेले कित्येक वर्षा पासून मुख्यअधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या माध्य...

इनर विल आणि न्यू शॉपिंग सेंटरच्या नवदुर्गा चा विधायक उपक्रम, आजारा पूर्वी त्याची दक्षता घेणे गरजेचे.डॉ .अर्चना ताई शिंदे यांचे प्रतिपादन.

इमेज
     अहमदपूर दि.10.10.21 स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जगामध्ये माणसाचे जीवन स्वास्थ्य बिघडले असल्याचे सांगून निरामय जीवन जगण्यासाठी प्राणायाम, ध्यान, योग करा. बदललेल्या जीवनशैलीमध्ये पूर्वी त्याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध भूल तज्ञ डॉ. अर्चना शिंदे यांनी केले.      त्या न्यू शॉपिंग सेंटर येथे इनरव्हील क्लब आणि न्यू शॉपिंग सेंटर च्या च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शरीर स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा भोसले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हृदयरोग तज्ञ डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ .संगमेश्वर हेंगणे, डॉ. अमृत चिवडे, डॉ. मनकर्णा पाटील, योग मूर्ती शिवमुर्ती भातंबरे ,डॉ. रत्नमाला हिंगणे .डॉ. जीवन शिंदे. दक्षयानी महिला मंडळाच्या अध्यक्षा माहेश्वरी शेटकार सह मान्यवर उपस्थित होते.      यावेळी डॉ. अर्चना शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की जीवनात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष ...

न्यायाची भीती बाळगू नका -जिल्हा व सत्र न्यायाधीश संभाजीराव ठाकरे

इमेज
 अहमदपूर -11/10//2021 कोरोनाच्या काळात ऑनलाइन मध्ये मुलांनी शिक्षण घेण्याऐवजी मोबाईल गेमकडे, विनाकारण मुलींना एस.एम.एस पाठवू नये असे आणि इतर आगाऊ कामाकडे वळल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तो गुन्हा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवन घडवायचे असेल तर वाचन, चिंतन, मनन, व्यायाम, प्राणायाम, ध्यान योगाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी न्यायाची भीती अजिबात बाळगू नका असे जाहीर आवाहन केले.        ते यशवंत विद्यालयात आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने बालकासाठी कायदे विषयक जनजागृती शिबिरात मार्गदर्शन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.       यावेळी व्यासपीठावर दिवाणी न्यायाधीश प्रसाद सवदीकर, दिवानी न्यायाधीश शामराव तोंडचीरे, दिवानी न्यायाधीश अतुल उत्पात, विशेष उपस्थिती टागोर शिक्षण समितीचे सचिव डी. बी. लोहारे गुरुजी, वकील संघाचे सदस्य एडवोकेट वीरेश उट्टे, मुख्याध्यापक व्ही.व्ही. गंपले सह मान्यवर उपस्थित होते.        यावेळी पुढे बोलताना न्यायाधीश संभाजीराव...

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी.व अजय मिश्रा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.या मागणीसाठी किनगाव येथील बाजार पेठ कडकडीत बंद पाळण्यात आला.

इमेज
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी.व अजय मिश्रा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. या मागणीसाठी किनगाव येथील बाजार पेठ कडकडीत बंद पाळण्यात आला. उत्तर प्रदेश मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी आंदोलक शेतकरी बांधवांना भरधाव वेगाने गाडीने चिरडून ठार केले त्यांच्या निषेधार्थ आज दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी किनगाव येथील बाजार पेठ बंद करून कडकडीत बंद पाळण्यात येऊन ,अजय मिश्रा यांच्या मुलावर जन्मठेप सुनावण्यात यावी व केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा अशी यासाठी किनगाव येथील बाजार पेठ कडकडीत बंद पाळण्यात आला. धनराज गिरी काँग्रेस, गणेश पांचाळ शिवसेना तालुका उपप्रमुख, संतोष आदटराव युवासेना तालुका उपप्रमुख, दिलदार शेख तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी, लक्ष्मण गुट्टे शिवसेना विभाग प्रमुख,मारोती बीराडे शिवसेना विभाग प्रमुख अंधोरी,बस्वराज शिलगिरे शिवसेना उपविभाग प्रमुख ,यानने गजानन उपविभा प्रमुख,शकील पठाण काँग्रेस,श्रीकांत मुंढे शिवसेना शाखा प्रमुख,गोविंद गुट्टे शिवसेना शाखा प...

ओला दुष्काळ जाहीर करण्याची वंचितची मागणी.

इमेज
  अहमदपूर ( प्रतिनिधी) पंचनामे व ई-पीक पहाणीचे ढोंग बंद करून अहमदपुर तालुक्यासह महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई व विमा देण्यात यांवा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड, कापूस, सह हाताशी आलेली सर्व पीकं उद्धवस्त झाली आहे त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करणे आवश्यक आहे पण सरकार ई-पीक पहाणी,पिक पंचनाम्यासारखी नाटक करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत तर इ-पिक पहाणी कशी करणार, तसेच झालेल्या नुकसानीची व राहिलेल्या पिकाची काढणी करणार का अर्ज करत बसणार अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारचे लोकप्रतिनिधी,अधीकारी पहाणी करतं आहेत, प्रचलित पद्धतीनुसार मंडळनिहाय नुकसान ठरवुन शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचे आदेशित करावे अशी मागणी वंचित बहूजन आघाडी अहमदपुरच्या वतीने उपविभागीय अधिकारी अहमदपुर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. अहमदपुर तालुक्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झ...

अतिवृष्टीने दोन पाझर तलाव फुटले व पिकाच्या झालेल्या नुकसानीची शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी केली पाहणी

इमेज
अहमदपूर तालुक्यात दिनांक ५,६,७ सप्टेंबर रोजी पाऊस जास्त झाल्याने पिकात पाणी साचून शेतकर्‍यांच्या प्रचंड प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नगदी तोंडावर काढणीला आलेले सोयाबीन,कापूस,उदीड व ऊस ही पीक-पिकात पाणी साचल्याने व ऊस आडवा पडल्याने वाया गेले आहेत.याची पाहणी करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांनी राजूर तालुक्यातील धानोरा (बु),चिखली येथे जाऊन दोन्ही पाझर तलावाची पाहणी केली.या तलावाची पाळू फुटल्यामुळे पाळू खलील शेतातील सोयाबीन व कापसाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली . व शेतातील साचलेल्या पाण्यात जाऊन पाहणी केली. शेतकरी बांधवांनी जिल्हाप्रमुख रेड्डी यांच्या समोर हंबरडा फोडून रडत पिकाचे नुकसान झाल्याची व्यथा मांडली. पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नका शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे पिकाची नुकसान बाबत माहिती देण्यात येईल, तुमचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी हा विषय मांडला जाईल आणि न्याय मिळ...