अतिवृष्टीने दोन पाझर तलाव फुटले व पिकाच्या झालेल्या नुकसानीची शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी केली पाहणी


अहमदपूर तालुक्यात दिनांक ५,६,७ सप्टेंबर रोजी पाऊस जास्त झाल्याने पिकात पाणी साचून शेतकर्‍यांच्या प्रचंड प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नगदी तोंडावर काढणीला आलेले सोयाबीन,कापूस,उदीड व ऊस ही पीक-पिकात पाणी साचल्याने व ऊस आडवा पडल्याने वाया गेले आहेत.याची पाहणी करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांनी राजूर तालुक्यातील धानोरा (बु),चिखली येथे जाऊन दोन्ही पाझर तलावाची पाहणी केली.या तलावाची पाळू फुटल्यामुळे पाळू खलील शेतातील सोयाबीन व कापसाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली . व शेतातील साचलेल्या पाण्यात जाऊन पाहणी केली. शेतकरी बांधवांनी जिल्हाप्रमुख रेड्डी यांच्या समोर हंबरडा फोडून रडत पिकाचे नुकसान झाल्याची व्यथा मांडली. पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नका शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे पिकाची नुकसान बाबत माहिती देण्यात येईल, तुमचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी हा विषय मांडला जाईल आणि न्याय मिळवून देऊ शेतकरी बांधवांनी खचून न जाता ओल्या दुष्काळाचे संकट परतवून लावण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीर पने उभा राहून अतिवृष्टीने गेलेल्या पिकाचा मोबदला मिळवून देऊ असे आश्वासन जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांनी पाहणी दरम्यान दिले.
यावेळी तहसीलदार कुळकर्णी साहेब,लघु पाटबंधारे स्थानिक स्तर अधिकारी,विमा कंपनीचे अधिकारी यांना फोनवर तात्काळ पंचनामे करा अशा सूचना दिल्या. शेतकरी बांधवांना दिले. पिकाची पाहणी करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांच्या सोबत तालुका उपप्रमुख गणेश पांचाळ, युवासेना तालुका उपप्रमुख संतोष आदटराव,सर्कल प्रमुख गजानन यनने,राजूर शहर कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले,वंदनीय बाळासाहेब ठाकरे मदत कक्षाचे तालुका प्रमुख बाळासाहेब पडिले,विजय सोळंके,ओम गुंडरे उपसरपंच बालाजी चाटे,पोलीस पाटील संग्राम बरुरे,माजी उपसरपंच वैजनाथ कराड,राहुल क्षीरसागर, राहुल कोपले,राजू मिटकरी,राम मिटकरी,पिनाटे दीपक,रमेश पगडले,अंकुश वडमिळे,दत्ता कारले,हरी कांबळे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे