पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले तर्फे तहसिलदार कार्यालय अहमदपूर मार्फत मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांना घरगुती विज व शेतकऱ्यांचे कृषीपंप विद्युत कनेक्शन तोडणी चालु असलेली मोहीम थांबविणे बाबत निवेदन

इमेज
*प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले तर्फे तहसिलदार कार्यालय अहमदपूर मार्फत मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांना घरगुती विज व शेतकऱ्यांचे कृषीपंप विद्युत कनेक्शन तोडणी चालु असलेली मोहीम थांबविणे बाबत निवेदन* अहमदपूर येथे आज तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे, युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले यांच्या नेतृत्वाखाली, जनतेची घरगुती विज बिलाची सक्तीची वसुली व शेतकऱ्यांचे कृषीपंप विद्युत कनेक्शन सरसकट तोडणी चालु असलेली मोहीम थांबविण्यासाठी तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले,चालु विज कनेक्शन न तोडता 1जुन 2021तारीख विज बील भरण्याची तारीख वाढुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पाण्यावाचुन लोकांचे व जणांवराचे बे हाल होत आहेत त्यात कोरोना माहामारीचे संकट आहे तरी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे तहसिलदार साहेब यांना असे निवेदन देण्यात आले. प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी,कोषा...

प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे किनगाव मधील वार्ड क्रं चार मधील हातपंप दुरुस्त करण्याची मागणी

इमेज
*प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे किनगाव मधील वार्ड क्रं चार मधील हातपंप दुरुस्त करण्याची मागणी* गटविकास अधिकारी कार्यालय पंचायत समिती अहमदपूर येथे आज तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे, युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले यांच्या नेतृत्वाखाली असे निवेदन देण्यात आले आहे की दोन महिने झाले किनगाव वार्ड क्रं चार बोडके गली मधील हातपंप बिघडला आहे तरी उन्हाळ्या सुरू झाला आहे, लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे पाणी टंचाई वाढत आहे, त्यात कोरोना माहामारीचे संकट आहे तरी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे सात दिवसांच्या आत हातपंप दुरुस्त नाही केला तर कोरोना महामारीचे भान ठेवून लोकशाही मार्गाने गटविकास अधिकारी कार्यालयात पंचायत समिती अहमदपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन देण्यात आले. प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी,कोषाध्यक्ष एजाज पठाण,सचिव दशरथ हैगले , प्रहार सेवक वैजन...

अहमदपूर तालुक्यातील तिर्थ (धानोरा) येथे अवघ्या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार

इमेज
*अहमदपूर तालुक्यातील तिर्थ (धानोरा) येथे अवघ्या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार*       माणुसकीला काळिमा फासणारी अशी घटना तिर्थ (धानोरा) या गावी घडली आहे. या काळात कोणावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती राहिली नाहीये. ७ तारखेला सकाळी चिमुकली आपल्या अंगणात खेळत असताना शेजारी राहणाऱ्या मुलाने तुला चॉकलेट घेऊन देतो, दहा रुपये देतो म्हणून तिला स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर अति प्रसंग करून त्या नाराधमाकडून अत्याचार करण्यात आला. ज्या वेळी मुलीच्या घरच्यांना या प्रसंगाबद्दल कळाले तेंव्हा मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून त्या नाराधमाविरुद्ध १९ तारखेला गुन्हा नोंदवण्यात आला.          सदरील आरोपी पळून जाणाच्या तयारीत असताना त्याला उदगीर येथील बस स्थानकावरून अटक करण्यात आली.      त्यामुळे मुलीकडील कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करण्यासाठी भाजप पक्षाच्या महिला जिल्हा व तालुक्यावरील पदाधिकाऱ्यांकडून भेट देण्यात आली. तसेच त्या नाराधमाविरुद्ध गुन्हा नोंद होऊन त्याच्यावर कार्यवाही होत आहे की नाही याची पण ...

बनसारोळा येथे उमेद अभियान अंतर्गत घरकुल मार्टचे उदघाटन संपन्न

इमेज
बनसारोळा येथे उमेद अभियान अंतर्गत घरकुल मार्टचे उदघाटन संपन्न . केज- दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी  दि 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मा. प्रकल्प सचांलक श्री. दादासाहेब वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल मार्ट ही संकल्पना राज्यभरातील प्रत्येक गावस्तरावर राबविण्यात येत आहे.त्याचाच भाग म्हणून 8. मार्च रोजी गटविकास अधिकारी दराडे,उमेद तालुका अभियान व्यवस्थापन केज अंतर्गत सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ अंतर्गत बनसारोळा येथे घरकुल मार्टचे उध्दघाटन माजी जिल्हा. परिषद सभापती गोदावरी ताई गोरे यांचे पती युवराज दादा गोरे यांच्या हस्ते पार पडले. कोरोणा विषाणूचे नियम पाळून व तोडांला मास्क कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की गावातील महिलांनी एकत्र येवून बचतगट माफ मार्फत घरकुल बाधंकामासाठी लागणारे साहित्य हे गावात उपलब्ध करुन देत आहेत. तर हे खूप चांगला उपक्रम असून बचत गटामार्फत केले जात आहे. त्यामुळे गावातील लोकांना सिमेंट टोपले लोखंड व इतर साहित्य घरकुल मार्टमध्ये मिळेल घरकुल व बाधंकाम ककरण्यासाठी सर्वांनी हे साहित्य गावातुनच खरेदी करावे आसे आवाहन ...

विस्कळलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत व स्वतंत्र करा -पुरोगामी पत्रकार संघाची निवेदनाद्वारे मागणी

इमेज
*विस्कळलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत व स्वतंत्र करा* ------------------------------------------------------ *पुरोगामी पत्रकार संघाची निवेदनाद्वारे मागणी* पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा केज वतीने शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच शहरातील वाढती वाहने ,वाहतूक हे लक्षात घेऊन कित्येक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, कानडी रोड, मंगळवार पेठ ,जयभवानी चौक ,उमरी रोड, बस स्टँड समोर, शासकीय रुग्णालयाकडे, या दिशेला सर्व वाहन ही वाहने लावणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती चार ही दिशेला, बेकायदेशीर वाहने , मोटर सायकल चार ,चाकी वाहने, ऑटो रिक्षा, बाजाराच्या दिवशी अशीच गर्दी पाहून ये-जा करणाऱ्या मोठमोठे वाहने आणि अवजड वाहने येण्यासाठी रस्ता अरुंद दिसून येत असतो. त्यामुळे वाहतूक शाखेचे याच्याचे दुर्लक्ष केलेले दिसून येते. बेकायदेशीर वाहने रोड च्या आजूबाजूला लावल्यामुळे तसेच अवजड वाहने सुध्दा त्याच्या आजूबाजूला लावल्या मुळे लागलेले आहेत.याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी व शहरातील गर्दी व वाहतुक व्यवस्था सुरळीत व स्वतंत्र करून सर्वसामान्य नागरिकां...