प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे किनगाव मधील वार्ड क्रं चार मधील हातपंप दुरुस्त करण्याची मागणी
*प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे किनगाव मधील वार्ड क्रं चार मधील हातपंप दुरुस्त करण्याची मागणी* गटविकास अधिकारी कार्यालय पंचायत समिती अहमदपूर येथे आज तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे, युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले यांच्या नेतृत्वाखाली असे निवेदन देण्यात आले आहे की दोन महिने झाले किनगाव वार्ड क्रं चार बोडके गली मधील हातपंप बिघडला आहे तरी उन्हाळ्या सुरू झाला आहे, लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे पाणी टंचाई वाढत आहे, त्यात कोरोना माहामारीचे संकट आहे तरी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे सात दिवसांच्या आत हातपंप दुरुस्त नाही केला तर कोरोना महामारीचे भान ठेवून लोकशाही मार्गाने गटविकास अधिकारी कार्यालयात पंचायत समिती अहमदपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन देण्यात आले. प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी,कोषाध्यक्ष एजाज पठाण,सचिव दशरथ हैगले , प्रहार सेवक वैजनाथ सुनेवाड, दिनेश किनकर,अनवर तांबोळी, वैजनाथ चाकाटे, बालाजी पांचाळ,इम्रान पठाण, बबलू कुरेशी,भिमा भंडारे, गणेश बोडके,अक्षय क्षिरसागर, गडकरी हनुमंत,सावता श्रृंगारे,ओम शेळके, सतिश पांचाळ, सुरेश सिध्देश्वरे, सतिश ठाकुर, रुतिक हुडगे अदिजण उपस्थित होते
टिप्पण्या