बनसारोळा येथे उमेद अभियान अंतर्गत घरकुल मार्टचे उदघाटन संपन्न
बनसारोळा येथे उमेद अभियान अंतर्गत घरकुल मार्टचे उदघाटन संपन्न .
केज- दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी
दि 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मा. प्रकल्प सचांलक श्री. दादासाहेब वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल मार्ट ही संकल्पना राज्यभरातील प्रत्येक गावस्तरावर राबविण्यात येत आहे.त्याचाच भाग म्हणून 8. मार्च रोजी गटविकास अधिकारी दराडे,उमेद तालुका अभियान व्यवस्थापन केज अंतर्गत सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ अंतर्गत बनसारोळा येथे घरकुल मार्टचे उध्दघाटन माजी जिल्हा. परिषद सभापती गोदावरी ताई गोरे यांचे पती युवराज दादा गोरे यांच्या हस्ते पार पडले. कोरोणा विषाणूचे नियम पाळून व तोडांला मास्क कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की गावातील महिलांनी एकत्र येवून बचतगट माफ मार्फत घरकुल बाधंकामासाठी लागणारे साहित्य हे गावात उपलब्ध करुन देत आहेत. तर हे खूप चांगला उपक्रम असून बचत गटामार्फत केले जात आहे. त्यामुळे गावातील लोकांना सिमेंट टोपले लोखंड व इतर साहित्य घरकुल मार्टमध्ये मिळेल घरकुल व बाधंकाम ककरण्यासाठी सर्वांनी हे साहित्य गावातुनच खरेदी करावे आसे आवाहन त्यांनी केले.तालुका अभियान व्यवस्थापक श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की गावातील बचत गट यांनी घरकुल मार्ट सुरु केले आहे.त्या कामी गावातील ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळाले आहे. त्यानी बाधंकामासाठी लागणारे साहित्य हे घरकुल मार्टमधून खरेदी करावे .परिणामी घरकुल बाधंकाम यास लागणारे ही वाजवी किमंतीत त्यांना गावातच मिळेल.सदरिल कार्यक्रमास तालुका व्यवस्थापक काळातील श्री.सचिन चव्हाण, विजय गोरेमाळी ,बालाजी वडगणे ,आकुंश मांदळे ,आश्रुबा गोरेमाळी ,सी.आर.पी. दिक्षा मेश्राम , ग्रामविकास अधिकारी मधुकर माने स सामाजिक कार्यकर्ते जयचंद धायगुडे ,बनसारोळा गावचे सरपंच निता बाळासाहेब धायगुडे, वंदना गायकवाड रेखाबाई गायकवाड ,घरकुलचे इंजिनिअर सुसलादे तसेच गावातील अन्य महिला व नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या