अहमदपूर तालुक्यातील तिर्थ (धानोरा) येथे अवघ्या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार
*अहमदपूर तालुक्यातील तिर्थ (धानोरा) येथे अवघ्या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार*
माणुसकीला काळिमा फासणारी अशी घटना तिर्थ (धानोरा) या गावी घडली आहे. या काळात कोणावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती राहिली नाहीये. ७ तारखेला सकाळी चिमुकली आपल्या अंगणात खेळत असताना शेजारी राहणाऱ्या मुलाने तुला चॉकलेट घेऊन देतो, दहा रुपये देतो म्हणून तिला स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर अति प्रसंग करून त्या नाराधमाकडून अत्याचार करण्यात आला. ज्या वेळी मुलीच्या घरच्यांना या प्रसंगाबद्दल कळाले तेंव्हा मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून त्या नाराधमाविरुद्ध १९ तारखेला गुन्हा नोंदवण्यात आला.
सदरील आरोपी पळून जाणाच्या तयारीत असताना त्याला उदगीर येथील बस स्थानकावरून अटक करण्यात आली.
त्यामुळे मुलीकडील कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करण्यासाठी भाजप पक्षाच्या महिला जिल्हा व तालुक्यावरील पदाधिकाऱ्यांकडून भेट देण्यात आली. तसेच त्या नाराधमाविरुद्ध गुन्हा नोंद होऊन त्याच्यावर कार्यवाही होत आहे की नाही याची पण पाहणी करण्यात आली.
टिप्पण्या