पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

इमेज
उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन      दि.२९/११/२०२१ रोजी मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांना मोघा ते किनी कडू या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित शाखा अभियंत्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देऊन सुध्दा कसलीही चौकशी केली नाही म्हणून  आज  दि.१३/१२/२०२१ रोजी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले  या आंदोलनास गणेश पांचाळ शिवसेना तालुका उपप्रमुख लक्ष्मण गुट्टे शिवसेना विभाग प्रमुख किनगाव,गजानन येने सर्कल प्रमुख धानोरा,किशोर सानप शाखा प्रमुख किनगाव,विजय सोळंके कार्यलय प्रमुख किनगाव,मारोती तरडे विभाग प्रमुख अधोरी,सोपान कोंडनगिरे सर्कल प्रमुख अधोरी,परमेश्वर विगवे,रवी मुंढे,...... आदी उपस्थित होते या वेळी या आंदोलनास प्रदीप भाऊ चौकटे शिवसेना तालुका प्रमुख,लक्ष्मण अलगुले शिवसेना शहर प्रमुख,प्रवीण डांगे यांनी आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला. व संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून दोषी अभियंत्यावर तात्काळ चौकशी करू चौकशिअंती दोषी अ...

१० डिसेंबर बुरूड समाजाचे* धर्मगुरु, आराध्य दैवत, महान तपस्वी "संत श्री केतय्या स्वामी " यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

इमेज
१० डिसेंबर बुरूड समाजाचे* धर्मगुरु, आराध्य दैवत, महान तपस्वी *संत श्री केतय्या स्वामी* यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.. ======================= या अभिवादन प्रसंगी उपस्थित.....धोंडिबा मारोती सुनेवड,  बाबू गोविंद लिंबाळे, गणपत लिंबाळे, अंबादास गोविंद लिंबाळे  अर्जुन गणपत  लिंबाळे,  नितीन बाबुराव देवके,  राहुल राजकुमार देवके,  वैजनाथ मल्लिकार्जुन देवके,  नारशिंग बाबुराव लिंबाळे, सचिन अंबादास लिंबाळे,  विकास सुंधरबाबू लिंबाळे, श्याम वाघमारे, अमोल दिलीप सुनेवाड, बंटी कांबळे,  सुनिल मल्लिकार्जुन देवके,  बालाजी मल्लिकार्जुन देवके, ओम बाबुराव लिंबाळे, राजकुमार मल्लिकार्जुन देवके,  सचिन लक्ष्मण सुनेवड.. आदि उपस्थित होते...

● जिल्ह्यातील रमाई घरकूलाचे प्रलंबीत हप्ते तातडीने द्या..!● सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयासमोर धरणे व निदर्शने अंदोलन.

इमेज
*लातूर दि.08* *लातूर जिल्ह्यातील रमाई घरकूल योजनेच्या अनुदानाचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबीत असून अनूसूचीत जातींच्या गोरगरीब लोकांचे स्वतःच्या हक्काच्या घरकूलाचे स्वप्न यंत्रणेच्या दूर्लक्षामूळे पूर्ण होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महानगरपालिका,सर्व नगर परिषदा आणी नगरपंचायती क्षेत्रातील प्रलंबीत असलेले अनुदान तातडीने द्यावे या मागणीसाठी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली धरने व निदर्शने अंदोलन करण्यात आले..* *आज लातूर येथे जिल्ह्याचे प्रादेशिक उपायुक्त,समाजकल्याण यांची भेट घेवून सम्राट मित्र मंडळाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात पुढे म्हटले आहे की,अनूसूचीत जातींच्या नागरिकांसाठी शासनाची रमाई घरकूल योजना खूप प्रभावी पणे राबविली जात आहे.या योजनेमूळे नागरी भागात मोठ्या प्रमाणात घरकूल साकारण्यास मदत झाली आहे.मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रमाई घरकूलाचे अनुदान मंजूर न झाल्याने नागरीकांमधून मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे.मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी अनुदान येणार या अपेक्षेने बांधकाम सूरू केले मात्र क...

अंबेजोगाई पुरोगामी पत्रकार संघातर्फे नूतन प्रदेशाध्यक्ष मा. विजयकुमार वाव्हळ सरांचे जंगी स्वागत

इमेज
*पत्रकार बांधवांच्या कायम पाठीशी - विजयकुमार वाव्हळ, प्रदेशाध्यक्ष, अ. भा. पु. प. सं, महाराष्ट्र राज्य* अंबेजोगाई(प्रतिनिधी):- दि. २७ व २८ नोव्हेंबर रोजी मालेगाव येथे पुरोगामी पत्रकार संघाचे दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष मा. विजयकुमार सुर्यवंशी यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून गेवराई चे उद्योजक तथा दै. महाभारत चे मुख्य संपादक मा. विजयकुमार वाव्हळ यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.                  नूतन प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्हातील सर्व तालुका कार्यकारिणी ने त्यांना सत्कार व संवाद भेटीसाठी आमंत्रित केले होते. या सत्कार व संवाद भेटी दरम्यान त्यांनी बीड, केज , अंबेजोगाई, परळी व माजलगाव अश्या बीड पूर्व भागातील अंबेजोगाई तालुका स्तरीय कार्यकर्त्यांकडून रेस्ट हाऊस येथे सत्कार स्वीकारला. विद्यार्थीदशेपासूनच मी अंबेजोगाईशी जोडलेला आहे व अंबेजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर असून प्रत्येक महाविद्यालयात 'विद्यार्थी संसद' निर्माण होणे सध्या का...

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..!

इमेज
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..! अहमदपूर दि. शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने आयोजीत केलेल्या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती गंगासागरबाई जाभाडे या होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री विनायकराव पाटील,प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाक्के पाटील,पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ,रिपाई राज्यसचिव बाबासाहेब कांबळे,युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,डाॅ.ओ.एल. किनगांवकर,प्राचार्य एम.बी वाघमारे,शिवछत्रपती पुरस्कार विजेते धर्मपाल गायकवाड,दत्तोबा कांबळे,शेख अय्याजभाई, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्या नंतर पुतळा समितीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी त्रीशरण पंचशिलाचे पठण केले.त्यानंतर अभिवादन सभा संपन्न झाली. या सभेत बोलताना माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की,या जगात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञ...

संत ज्ञानेश्वर विद्यालयात संजीवन समाधी सोहळा संपन्न.

इमेज
 अहमदपूर दिनांक 2 डिसेंबर 2021 येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.  सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. श्री अमरदीप भैय्या हाके -पाटील उत्तर मुंबई भाजपा युवा मोर्चा जिल्हा मंत्री, तर प्रमुख पाहुणे गंगासागर जाभाडे ताई सभापती पंचायत समिती अहमदपूर, श्री बालाजी गुट्टे उपसभापती पंचायत समिती अहमदपूर ,अनुराधाताई नळेगावकर सभापती नगर परिषद अहमदपुर, बाळासाहेब मुंढे सरपंच हगदळ, बालाजी फुलमंटे सह मान्यवर उपस्थित होते.  यावेळी अध्यक्षस्थानावरून अमरदीप हाके -पाटील म्हणाले की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अनमोल असून त्याचे प्रत्येकाने घराघरांमध्ये वाचन केले पाहिजे. यावेळी बालाजी गुट्टे ,अनुराधाताई नाळेगावकर यांचे माऊलींच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन पर अशी भाषणे झाली .दुपारी ठीक 12 वाजता गुलाल उधळण्याचा कार्यक्रम महाआरती करून संपन्न झाला .यावेळी पहिली ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांची माऊलींच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी केले तर सूत्रसंचालन ...