अंबेजोगाई पुरोगामी पत्रकार संघातर्फे नूतन प्रदेशाध्यक्ष मा. विजयकुमार वाव्हळ सरांचे जंगी स्वागत
*पत्रकार बांधवांच्या कायम पाठीशी - विजयकुमार वाव्हळ, प्रदेशाध्यक्ष, अ. भा. पु. प. सं, महाराष्ट्र राज्य*
अंबेजोगाई(प्रतिनिधी):- दि. २७ व २८ नोव्हेंबर रोजी मालेगाव येथे पुरोगामी पत्रकार संघाचे दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष मा. विजयकुमार सुर्यवंशी यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून गेवराई चे उद्योजक तथा दै. महाभारत चे मुख्य संपादक मा. विजयकुमार वाव्हळ यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.
नूतन प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्हातील सर्व तालुका कार्यकारिणी ने त्यांना सत्कार व संवाद भेटीसाठी आमंत्रित केले होते. या सत्कार व संवाद भेटी दरम्यान त्यांनी बीड, केज , अंबेजोगाई, परळी व माजलगाव अश्या बीड पूर्व भागातील अंबेजोगाई तालुका स्तरीय कार्यकर्त्यांकडून रेस्ट हाऊस येथे सत्कार स्वीकारला. विद्यार्थीदशेपासूनच मी अंबेजोगाईशी जोडलेला आहे व अंबेजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर असून प्रत्येक महाविद्यालयात 'विद्यार्थी संसद' निर्माण होणे सध्या काळाची गरज आहे.बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या मी सदैव पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचे यावेळी ते म्हणाले. यावेळी राज्य संघटक भागवत वैद्य, मराठवाडा उपाध्यक्ष स का पाटेकर,दैनिक महाभारत चे कार्यकारी संपादक ,दैनिक गणनायक चे संपादक माणिक कोकाटे, जिल्हा सचिव राजकुमार धिवार व तालुका कार्यकारणी चे तालुका अध्यक्ष अहमद पठाण, सचिव प्रसेनजित आचार्य,सहसचिव जमीरभाई शेख, कोषाध्यक्ष अजय गोरे, सहकोषाध्यक्ष उस्मानी सर, फेरोझ शेख इ उपस्थित होते.
टिप्पण्या