संत ज्ञानेश्वर विद्यालयात संजीवन समाधी सोहळा संपन्न.

 अहमदपूर दिनांक 2 डिसेंबर 2021 येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.
 सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. श्री अमरदीप भैय्या हाके -पाटील उत्तर मुंबई भाजपा युवा मोर्चा जिल्हा मंत्री, तर प्रमुख पाहुणे गंगासागर जाभाडे ताई सभापती पंचायत समिती अहमदपूर, श्री बालाजी गुट्टे उपसभापती पंचायत समिती अहमदपूर ,अनुराधाताई नळेगावकर सभापती नगर परिषद अहमदपुर, बाळासाहेब मुंढे सरपंच हगदळ, बालाजी फुलमंटे सह मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी अध्यक्षस्थानावरून अमरदीप हाके -पाटील म्हणाले की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अनमोल असून त्याचे प्रत्येकाने घराघरांमध्ये वाचन केले पाहिजे. यावेळी बालाजी गुट्टे ,अनुराधाताई नाळेगावकर यांचे माऊलींच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन पर अशी भाषणे झाली .दुपारी ठीक 12 वाजता गुलाल उधळण्याचा कार्यक्रम महाआरती करून संपन्न झाला .यावेळी पहिली ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांची माऊलींच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी मानले .कार्यक्रमाची सांगता त्रिगुणा मोरगे यांनी पसायदान घेऊन केली. त्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे