● जिल्ह्यातील रमाई घरकूलाचे प्रलंबीत हप्ते तातडीने द्या..!● सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयासमोर धरणे व निदर्शने अंदोलन.
*लातूर दि.08*
*लातूर जिल्ह्यातील रमाई घरकूल योजनेच्या अनुदानाचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबीत असून अनूसूचीत जातींच्या गोरगरीब लोकांचे स्वतःच्या हक्काच्या घरकूलाचे स्वप्न यंत्रणेच्या दूर्लक्षामूळे पूर्ण होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महानगरपालिका,सर्व नगर परिषदा आणी नगरपंचायती क्षेत्रातील प्रलंबीत असलेले अनुदान तातडीने द्यावे या मागणीसाठी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली धरने व निदर्शने अंदोलन करण्यात आले..*
*आज लातूर येथे जिल्ह्याचे प्रादेशिक उपायुक्त,समाजकल्याण यांची भेट घेवून सम्राट मित्र मंडळाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात पुढे म्हटले आहे की,अनूसूचीत जातींच्या नागरिकांसाठी शासनाची रमाई घरकूल योजना खूप प्रभावी पणे राबविली जात आहे.या योजनेमूळे नागरी भागात मोठ्या प्रमाणात घरकूल साकारण्यास मदत झाली आहे.मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रमाई घरकूलाचे अनुदान मंजूर न झाल्याने नागरीकांमधून मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे.मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी अनुदान येणार या अपेक्षेने बांधकाम सूरू केले मात्र कित्येक महिने होवून सूध्दा अनुदान आले नाही त्यामूळे उसनवारी,व्याजी करून बांधकाम सूरू केले आहे.मात्र लाभार्थ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.त्यामूळे घरकूलांचे तातडीने अनुदान मंजूर करावे,घरकूल निर्माण समितीच्या बैठका नियोजित वेळेत घ्यावे,रमाई घरकूलाचे ग्रामीण व शहरी भागातील उद्दीष्ट वाढवून द्यावे.या मागण्या पूर्ण केल्या नसल्यास मूंबई येथे होणाऱ्या राज्यविधिमंडळाच्या अधिवेशनावर निदर्शने/निदर्शने/उपोषण/मोर्चा अशा स्वरूपाचे अंदोलन करण्यात येईल असे नमूद केले आहे.*
*सदरील मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवून लवकरात लवकर अनुदान मंजूरीसाठी पाठपूरावा केला जाईल असे अश्वासन प्रादेशिक आयुक्त समाजकल्याण लातूर यांनी शिष्टमंडळास दिले.*
*या निवेदनावर डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,गफारखान पठाण, प्रशांत जाभाडे,जीवनराव गायकवाड,अजय भालेराव, मूकूंद वाघमारे,तिरूपती वाघमारे,राजेंद्र मेकाले,गिरीष गोंन्टे,सिध्दार्थ वाघमारे, दिगंबरराव वाघमारे,शरद कांबळे,आकाश सांगवीकर,शरद सोनकांबळे,सचिन बानाटे,भिमराव कांबळे, संभाजीराव कांबळे, कैलास भालेराव,माणिक वाघमारे, गणेशराव मूंडे,सूनिल कोमले,मतीन शेख,नितीन कांबळे, सुनिल मोरे,नवनाथ भालेराव,विजय भालेराव,गोविंदराव ढोले,रणजीत वाघमारे,गजानन चिलकेवार,धनंजय कांबळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत*
टिप्पण्या