यशवंत विद्यालयाचे क्रीडा क्षेत्रात नेत्र दीपक भरारी
*यशवंत विद्यालयाचे क्रीडा क्षेत्रात नेत्र दीपक भरारी*. अहमदपूर( दि. 26. 11. 22) क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धेत यशवंत विद्यालयाच्या क्रीडापटुनी विविध क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यशाची परंपरा कायम केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. शिरूर ताजबंद येथे झालेल्या 17 व 19 वर्षीय क्रिकेट स्पर्धेत यशवंत विद्यालयाचा संघ तालुक्यात सर्वप्रथम राहिला .या स्पर्धेत श्रेयस मुस्तापुरे, राहील शेख, देवेश माळी, गोविंदराज धुळगुंडे, शुभम सोनटक्के, शुभम राठोड, तनिष्क महा के, वेदांत गिरी यांनी खेळांचे उत्तम प्रदर्शन करून विजय हस्तगत केला. लातूर येथे झालेल्या 14 वर्षे वयोगट टेनिक्वाईट संघ जिल्ह्यात सर्वप्रथम राहिला. त्यात कॅप्टन अनिकेत बावगे, रुद्रप्रसाद फुलमंटे, अबरार सय्यद, प्रणव चोचंडे, शुभम मेंडके, अथर्व हिंगणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयांमध्ये ज...