यशवंत विद्यालयाचे क्रीडा क्षेत्रात नेत्र दीपक भरारी

*यशवंत विद्यालयाचे क्रीडा क्षेत्रात नेत्र दीपक भरारी*.
     अहमदपूर( दि. 26. 11. 22) क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धेत यशवंत विद्यालयाच्या क्रीडापटुनी विविध क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यशाची परंपरा कायम केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
     शिरूर ताजबंद येथे झालेल्या 17 व 19 वर्षीय क्रिकेट स्पर्धेत यशवंत विद्यालयाचा संघ तालुक्यात सर्वप्रथम राहिला .या स्पर्धेत श्रेयस मुस्तापुरे, राहील शेख, देवेश माळी, गोविंदराज धुळगुंडे, शुभम सोनटक्के, शुभम राठोड, तनिष्क महा के, वेदांत गिरी यांनी खेळांचे उत्तम प्रदर्शन करून विजय हस्तगत केला.
     लातूर येथे झालेल्या 14 वर्षे वयोगट टेनिक्वाईट संघ जिल्ह्यात सर्वप्रथम राहिला. त्यात कॅप्टन अनिकेत बावगे, रुद्रप्रसाद फुलमंटे, अबरार सय्यद, प्रणव चोचंडे, शुभम मेंडके, अथर्व हिंगणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
    अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयांमध्ये जिल्हास्तरीय सायकलींग स्पर्धेत सर्वप्रथम नंदश्री लवराळे ,रुद्रप्रसाद फुलमंटे, सौख्या डोंगरे ,सृष्टी पाटील, करण गलाले यांनी विजय हस्तगत केला तर तालुकास्तरीय कराटे व जिल्हास्तरीय तायव्वांदो स्पर्धेत गणेश गुणाले, वेदांत पवार, श्रुती आरदवाड, संबोधी सोमवंशी, अंकिता घोडके ,अवनी देशमुख ,हर्षवर्धन सोमवंशी ,प्रणव बुर्गे, सचिन लुंगारे या विद्यार्थ्यांनी विजय संपादन केला.
    तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये यशवंत विद्यालयाचा अर्जुन इप्पर, संगम कुंटे व आदित्य नव टक्के हे विजय ठरले आहेत.
     या सर्व क्रीडापटूंना क्रीडा विभाग प्रमुख संतोष कदम दीपक हिंगणे प्रभावती मिरजकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
    क्रीडा क्षेत्रातील यां नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक सांगवीकर ,सचिव डी बी लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही व्ही. गंपले, उप मुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, राम तत्तापुरे, अशोक पेंदेवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे