विधवा प्रथा बंदीचा ग्रामपंचायत नागझरी चा निर्णय
विधवा प्रथा बंदीचा ग्रामपंचायत नागझरी चा निर्णय
मौजे नागझरी ता. अहमदपूर येथे विधवा प्रथा बंदीचा निर्णय दिनांक 16 नोहेम्बर 2022 रोजी झालेले ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.
सूचक सौ कविता नागनाथ उगिले या होत्या तर अनुमोदन सौ रुक्मिणीबाई ज्ञानोबा इप्पर (ग्रा.पं. सदस्य), यांनी केले. सरपंच रामकिशन एकनाथ सुर्यवंशी यांच्या अधक्षेतेखली ग्रामसभा पार पडली उपसरपंच उद्धव ज्ञानोबा इप्पर, रुक्मिणी संजय मुंढे (ग्रा.पं. सदस्य), सौ.सुनिता नागनाथ अलापूरे (ग्रा.पं. सदस्य), नाथराव संतोबा इप्पर (ग्रा.पं. सदस्य), चंद्रकला विजय इप्पर (ग्रा.पं. सदस्य), अंकूश दौलत इप्पर सोसायटी चेरमन तसेच गावातील सर्व महिला, पुरुष, प्रतिष्ठित नागरिक उपस्थीत होतें. प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक शिवाजी कोल्हे उपस्थित होते.
2021 पासुन या अगोदर पण ग्रामपंचयतीतर्फे असे धाडशी निर्णय घेण्यात आले आहेत. जसे की गावात दारु विकणे, दारू पिऊन शिव्या देणे, बायका मुलांना त्रास देणें, गावात डाव (पत्ते) खेळणे या गोष्टीवर ग्रांपणाच्यात्तर्फे ठरवा घेऊन बंदी आणली आहे व ती 100% पाळली जाते.
टिप्पण्या