फुले दांपत्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे-प्राचार्य व्ही व्ही गंपले यांचे प्रतिपादन.

फुले दांपत्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे.
प्राचार्य व्ही व्ही गंपले यांचे प्रतिपादन.
    अहमदपूर दि28.11.2022 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये फुले दांपत्यांनी शिक्षणाच्या विकासासाठी लढा दिला. त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मुलांनी आपले जीवन घडवावे असे प्राचार्य व्ही व्ही गंपले यांनी सांगितले.
    ते दि. 28 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त यशवंत विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी विचारपीठावर प्रमुख अतिथी पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र शासनाचा महात्मा बसेश्वर पुरस्कार विजेते राम तत्तापुरे ,सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजकुमार पाटील, सहाय्यक शरद करकनाळे, विद्यार्थी संसदेच्या सचिव कुमारी गायत्री मालवदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
    यावेळी श्री राम तत्तापुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना मोठे व्हायचे असेल तर अभ्यासावर, समाजाप्रती प्रेम, जिव्हाळा, तळमळ ठेवून कर्तव्याशी अत्यंत प्रामाणिकपणे वागले तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्याप्रमाणे नाव या विश्वामध्ये अजरामर होते. म्हणून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, परिश्रम ठेवून मनःपूर्वक अभ्यास करावा असे जाहीर आवाहन केले.
    यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मार्गदर्शनपर अशा स्वरूपाची भाषणे झाली.
    कार्यक्रमाचा शुभारंभ महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी तालुका आणि जिल्हा क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
     यावेळी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रतिभा सोलपूरे, माधव मुकनर ,संतोष मालवदे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजकुमार पाटील यांनी तर आभार शरद करकनाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे