फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

*फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण*

अहमदपूर/प्रतिनिधी 
मौलाना अबुल कलाम आज़ाद यांना अगदी लहान वयापासूनच प्रचंड वाचनाची आवड होती.त्यातूनच वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी अल-हिलाल नावाचे वर्तमानपत्र सुरू केले आणि त्यात इंग्रजांच्या विरोधात लेखन केले व भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले म्हणून त्यांना इंग्रजांनी तुरूंगात टाकले , असे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.ते आज सिटी प्लाजा येथे पार पडलेल्या अहमदपूर-चाकूर तालुक्यातील उर्दू माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांंच्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोहसीन बायजीद, प्रमुख व्याख्याते म्हणून हैद्राबाद येथील मौलाना अब्दुल क़वीसाहब दामत बरकातहूम,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजित उर्फ बालाजी रेड्डी,काॅंग्रेस आयचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन,साजिदभाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सय्यद साजिदभाई,माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब पटेल जागीरदार,माजी उपनगराध्यक्ष कलिमोद्दीन अहमद, मौलाना उस्मान फैसल क़ासमी,कारी मोहम्मद असदसाहब, मौलाना इसहाक साहब, मौलाना खुरेशी एजाज साहब,प्रा डॉ भुषणकुमार जोरगुलवार, डॉ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, मोहीब कादरी,तसेच ज्यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे निरीक्षक म्हणून काम पाहिले ते निरीक्षक मलिक निजामीसाब व मुजफ्फरोद्दीन साहेब, नोबल हायस्कूल नांदेडचे मुख्याध्यापक वदूद सर आदींची उपस्थिती होती.
      पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, जेव्हा फाळणी झाली तेव्हा मौलाना आझाद दिल्लीच्या मशिदीसमोर उभे राहून सर्वांना भारतातच राहण्यासाठी विनंती करत होते.भारत सोडू नका असे कळवळून सांगत होते यावरून हेच सिद्ध होते की ते अखंड भारतासाठी सतत प्रयत्नशील होते.यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी धडपड केली पाहिजे.त्यांच्या शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यायला हवे.मुस्लिम समाजात शिक्षणांसाठी आणखी प्रसाराची आणि प्रचाराची आवश्यकता आहे.यावेळी डॉ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी,प्रा डॉ भुषणकुमार जोरगुलवार, अब्दुल मुजीब पटेल जागीरदार, बालाजी रेड्डी आदींनी मार्गदर्शन केले.
     तत्पूर्वी २७ नोव्हेंबर रोजी शिक्षण दिन अर्थात मौलाना अबुल कलाम आज़ाद यांच्या जयंतीनिमित्त अहमदपूर चाकूर तालुक्यातील ऊर्दू माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांंच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सिटी प्लाजा येथे करण्यात आले होते ज्याचे अध्यक्षीय स्थान अब्दुल मुजीब पटेल जागीरदार यांनी भुषविले होते.यात तब्बल ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवले होते. या स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.प्राथमिक स्तर ज्याचे प्रथम बक्षीस स्व.शेख अ.हकीम यांच्या स्मरणार्थ शेख फहिम अ. हकीम यांच्या वतीने रू २१००० व चषक चाऊस अफ्फान गालिब के जी एन स्कूल अहमदपूर यांनी जिंकले तर द्वितीय बक्षीस स्व.हुसेनखां तुर्राबखां पठाण यांच्या स्मरणार्थ फारुखखां हुसेन खाँ पठाण यांच्या वतीने ११००० रू व चषक काजी जिकरा सलाउद्दीन अल फारूख प्राथ शाळा नळेगाव यांनी जिंकले तर तृतीय क्रमांकासाठी मीर अकबर अली यांच्या वतीने ७००० व चषक शेख मिसबा कासिम अल फारूख प्राथ शाळा नळेगाव यांनी जिंकले आणि माध्यमिक स्तरावरील प्रथम बक्षीस स्व अ गनी मो.इस्माईल यांच्या स्मरणार्थ शेख वाजीद भाई यांच्या वतीने रू २१००० व चषक शेख मुहम्मद सय्यद रसूल ए.एच.रिझवी हायस्कूल हाडोळती यांनी जिंकले तर द्वितीय क्रमांकांचं बक्षीस स्व अख्तर जमाखां उस्मान खान पटेल यांच्या स्मरणार्थ अन्वर पटेल यांच्या वतीने रु ११००० व चषक मुजावर अल्फिया तौखिर अल फारूख हायस्कूल नळेगाव यांनी जिंकले तर तृतीय क्रमांकासाठी शेख मेहरुन्नीसा अ.गनी यांच्या वतीने रू ७००० व चषक शेख मसिरा मुर्तुजा अली मौलाना आझाद हायस्कूल अहमदपूर यांनी जिंकले तर उत्तेजनार्थ बक्षीसांची रक्कम अ.वहाब पटेल जागीरदार, देशमुख समीर अहमद जहीरमियां,शेख अजीम सलीम आणि सय्यद सादत शब्बीर यांच्या वतीने प्रत्येकी २००० रू व चषक असे स्वरूप होते जे अनुक्रमे शेख नाजिमा ताजोद्दीन एस ए जागीरदार हायस्कूल काळेगाव, देशमुख सदफ अथहरमियां पि ए इनामदार हायस्कूल किनगाव,शेख रायान इरफान हक्कानिया उर्दू हायस्कूल चाकूर, शेख अदिबा सायाम वाजीद अल कदिर प्रायमरी स्कूल हाडोळती यांना देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिलानी शेख सर आणि रियाज मिचलकर सर यांनी केले तर आभार रियाजोद्दीन काजी यांनी केले.याप्रसंगी शिक्षणप्रेमींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फैज़ एक आम चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे