कालवश लता वसंतराव जावळे यांच्या स्मरनार्थ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना.
कालवश लता वसंतराव जावळे यांच्या स्मरनार्थ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना. माजलगांव : ( प्रतिनिधी ) शहरातील यशोधरा बुद्ध विहार फुले नगर माजलगांव येथे वसंतराव बाबुराव जावळे यांच्या पत्नी कालवश लता वसंतराव जावळे यांच्या स्मरनार्थ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा o७ फुट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यववरांच्या उपस्थीतीत व पूजनिय भदंत पंय्यातीस महाथेरो ( सिरसाळा ) यांच्या हस्ते दिनांक ११ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पंकज वसंतराव जावळे , प्रज्ञानंद वसंतराव जावळे , प्रितमकुमार वसंतराव जावळे व प्रज्वल वसंतराव जावळे यांनी केले असून सात फूट उंचीच्या भव्य अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची मिरवणूक यशोधरा बुद्ध विहार फुलेनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन यशोधरा बुद्ध विहारा पर्यंत काढण्यात आली. या मिरवणूकी मध्ये शहरातील बुद्ध व डॉ.आंबेडकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमद...