बहुजनांनी डॉ.आंबेडकर, भगवान बुद्ध यांचे पंचशील तत्वज्ञान आत्मसात करून समाज सुधारण्याचे काम करावे...... आमदार, बाबासाहेब पाटील
बहुजनांनी डॉ.आंबेडकर, भगवान बुद्ध यांचे पंचशील तत्वज्ञान आत्मसात करून समाज सुधारण्याचे काम करावे......
आमदार, बाबासाहेब पाटील
----------------------------------------
अहमदपूर- अहमदपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित " 66 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 66 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येऊन आणि पंचशील त्रिशरण घेण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घघाटक अहमदपूर-चाकुर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील हे आपल्या भाषणात म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना ही अथक परिश्रम घेऊन लिहून काढली. हे संविधान सर्व जगात सर्वश्रेष्ठ असून.या संविधानामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला.या संविधानामुळे या देशात, जगात शांतता पंचशील आणि गौतम बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञानाचा प्रसार, झाला असून.
त्यामुळे बहुजनांनी डॉ. आंबेडकरांचे व भगवान गौतम बुद्धांचे पंचशील तत्त्वज्ञान आत्मसात करून समाज सुधारण्याचे काम करावे जेणेकरून समाजामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, यांचे विचार समाजातील लोकांच्या मनात,
-हदयात रुजविण्याचे काम करावे आणि आपण सर्वांनी हे केले पाहिजे आहे पण काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे या संविधानाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत ते आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानात सर्व जाती धर्मांना समान न्याय देण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केलेले आहे. त्यामुळे आपण या संविधानाचा आदर करून त्याचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे किंवा उचलली पाहिजे त्यामुळे या संविधानाचे पावित्र्य अबाधित राहील असे आमदार बाबासाहेब पाटील आपल्या उद्घघाटकपर भाषणात म्हणाले.यावेळी माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, अॅड हेमंत पाटील, चंद्रकांत मध्दे, शिवानंद तात्या हेंगणे, बाबासाहेब कांबळे, माधव जाधव, सांब महाजन, मनोहर गायकवाड, इत्यादी मान्यवरांनी आपले विचार भाषणातून मांडले.
यावेळी प्रास्ताविक कार्यक्रमाचे निमंत्रक/ आयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी आपले विचार भाषणातून व्यक्त केले.
तत्पूर्वी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व शाहीर सुभाष साबळे यांनी त्रिशरण पंचशील घेतले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, अॅड. भारत चामे. डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, माधव जाधव, प्रकाश फुलारी, सांब महाजन,चंद्रकांत मध्ये, बाबासाहेब कांबळे,अॅड. हेमंत पाटील, पत्रकार मेघराज गायकवाड,त्रिशरण वाघमारे, भीमराव कांबळे, दिनकर मद्येवार, अॅड.टि.एन.कांबळे, शिवानंद हेंगणे, प्रवीण रेड्डी, प्रकाश ससाने, शिवाजी जंगापल्ले, रामभाऊ बेल्लाळे, गोविंद गिरी, नाझीम शेख, बालाजी कोकाटे, प्रकाश ससाने, निवृत्ती कांबळे, विकास महाजन, आशिष तोगरे, अशोक सोनकांबळे, सूर्यकांत कोकाटे, कांबळे सर , रुपेश कांबळे, सचिन गायकवाड, सुहास गायकवाड, सुनील डावरे, नवरंगे, बालाजी शिंदे ,अण्णाराव सूर्यवंशी, प्रल्हाद ढवळे, अॅड. इरले, पिराजी शिंदे, अजिंक्य बनसोडे, आकाश व्यवहारे, कलीम शेख, बाबू शेख. इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर गायकवाड यांनी केले. तर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्याचे आभार डॉ.संजय वाघंबर यांनी सर्वांचे आभार मानले.....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शहरातील व तालुक्यातील सर्व समतावादी आणि बहुजन नागरिक दिवसभर अभिवादन करण्यासाठी येत होते आणि आपल्या उद्धारकर्त्या भीम बाबाला अभिवादन करून दर्शन घेत होते...
टिप्पण्या