प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व..!माजी आमदार बब्रूवान खंदाडे यांचे प्रतिपादन
प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व..!
अहमदपूर दि. राजकारण, समाजकारण आणी व्यापार अशा अनेक क्षेत्रात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून शिक्षणामुळे माणूस प्रगल्भ बनतो व समस्यांच्या उपायोजना शोधण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे प्रत्येकानेच शिक्षणाची कास धरावी असे आग्रही प्रतिपादन माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले.
येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या मान्यवरांचा छोटेखानी सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषद सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल प्रा.डॉ. नारायण कांबळे, सेंट्रल युनिव्हर्सिटी अमेरिकेची डिलीट पदवी मिळाल्याबद्दल प्रा.डाॅ. सतीश ससाने तसेच अभिजीत वाघमारे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी बोलताना खंदाडे म्हणाले की, शिक्षणामुळे सर्वांगीण विकास होतो समाजातील सर्व घटकांनी सातत्याने शिकण्याचा प्रयत्न करावा.
या सत्काराला उत्तर देताना प्रा.डॉ.नारायण कांबळे म्हणाले की,मी नेहमीच सत्य आणि स्पष्ट बोलतो या स्पष्ट बोलण्यामुळे कधी कधी अडचणी निर्माण होतात पण नंतर गैरसमज दूर होऊ शकतो समाज उपयोगी शिक्षणाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सातत्याने पुरस्कार करेल व या कामी माझी भूमिका अग्रणी असेल असे प्रतिपादन केले.
प्रा.डाॅ. सतीश ससाणे म्हणाले की,सर्वसामान्य परिस्थितीतून केवळ आणि केवळ शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही प्रगती करू शकलो त्यामुळे आमच्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे त्यासाठी तरुण पिढीने सुद्धा सातत्याने शिक्षण घेण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक युवक नेते डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी करून समाजामध्ये जे जे चांगलं आहे त्या चांगल्या च्या पाठीमागे समाजातील प्रत्येक घटकांनी थांबले पाहिजे ही भूमिका सम्राट मित्र मंडळाची असून यासाठीच हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माजी कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदराव गिरी यांनी मांडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार विलास चापोलीकर, प्रेमनाथ गायकवाड, अजय भालेराव, गणेशराव मुंडे,सचिन बानाटे,भीमराव कांबळे, दत्ता कांबळे आदींनी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमासाठी डाॅ.संतोष मूंडे,अजय मूरमूरे,डाॅ.बाळू कराड,प्रा.अमोल इंगळे, डाॅ.गायकवाड,डाॅ.माने,डाॅ कूंडलवाड,डाॅ.राजू कांबळे,प्रा.प्रकाश कांबळे आदींसह
मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती होती.
टिप्पण्या