शिवसेना स्वारिप युती प्रार्थमिक बैठक संपंन्न - विजय साळवे

शिवसेना स्वारिप युती प्रार्थमिक बैठक संपंन्न - विजय साळवे

माजलगाव :- आगामी काळात जुल्मी भाजपा सरकारला रोकण्यासाठी
महाराष्ट्रात शिवसेना व स्वारिप नेत्यांची युती बाबात महत्वपूर्ण बैठक उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती ना. निलमताई गोरे यांच्या सोबत आंबेडकरी प्रख्यात विचारवंत अर्जुनजी डांगळे सह स्वारीप नेते अशोक वाघमारे, बाळाराम जाधव , अमित हिरवे, विजय साळवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
महाराष्ट्रातील धर्मांध शक्तींचा बिमोड करून जुलमी भाजपा सरकारला आगामी काळात रोखण्यासाठी शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष विजय साळवे यांनी सांगितले असून यासंदर्भात दिनांक ०७ डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलमताई गोरे यांच्यासोबत अत्यंत साधक बाधक चर्चा स्वारीपच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची विधानभवनाच्या सभागृहात संपन्न झाली आहे. लवकरच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत भेट घेऊन आगामी काळातील घडामोडींवर सविस्तर चर्चा करून शिवशक्ती भीमशक्ती एकत्र करण्यासाठी रिपाई चे सर्व विखुरलेले गट एकत्र करून देशात नवा राजनैतिक इतिहास घडवण्यासाठी शिवसेना स्वारीप युतीवर शिक्का मोर्तब होणार असल्याचे विजय साळवे यांनी म्हटले असून या महत्वूर्ण बैठकीस प्रख्यात आंबेडकरी विचारवंत रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे स्वारीपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक वाघमारे , महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाळाराम जाधव , मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित भाई हिरवे व मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे