यशवंत विद्यालयामध्ये डॉक्टर बाबा साहेबांना अभिवादन

*यशवंत विद्यालयामध्ये डॉक्टर बाबा साहेबांना अभिवादन*
    अहमदपूर दि.(0 6. 12. 22) भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने यशवंत विद्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेला प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
    यावेळी सहशिक्षक श्री राजकुमार पाटील म्हणाले की, वाचाल तर वाचाल म्हणून मुलांनी शालेय जीवनामध्ये पुस्तकांचे वाचन मन लावून केले. तरच आपले पुढचे जीवन सुखी आणि यशस्वी होते असे सांगितले.
    यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने दहावी वर्गातील संकल्प वाघमारे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या सोहळ्याचा अध्यक्ष समारोप प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या भाषणाने झाला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन शरद करकनाळे यांनी आभार प्रवीण मोरे यांनी मानले.
    यावेळी या सोहळ्याला पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, अशोक पेद्यै वाढ, अरुण मोरे सह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे