प्रविण तरडे आणि संविधान
*बिनडोक प्रविण तरडेच्या 'पुस्तक बाप्पा' च्या निमित्तानं -*
---------------------------------------------------
प्रवीण तरडे यानं त्याच्या घरच्या गणपतीला यंदा 'पुस्तक बाप्पा' अशा संकल्पनेत बसवून सजावट केलीय. सदर आरास मध्ये त्यानं त्याच्या घरातील विविध पुस्तकं एकावर एक रचून खांब उभे केलेत व पुस्तकांच्या त्या खांबावर राम, पांडुरंग, समर्थ स्वामी इत्यादींच्या प्रतिकृती स्वरुप *खेळणी* बसवलीत. तर, या सजावटीच्या मध्यभागी चक्क संविधानाच्या पुस्तकावर पाट ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवलीय.
या त्याच्या बावळटासारख्या सजावटीचा फोटो वायरल होताच *संविधान-भक्त* दलित चवताळले अन त्याला चांगलाच फैलावर घेतलं. आपल्या बालिश कृत्याची सारवासारव करताना बिनडोक प्रवीण तरडेनी जे कारण दिलंय ते म्हणजे मूर्खपणाचा कळसच.
प्रवीण तरडेचं म्हणणं पडलं की, *'बुद्धीची देवता- _गणपती_ अन बुद्धीचं सर्वांत मोठं प्रतिक - _संविधान_ एकत्र असावं'* या धारणेतुन त्यानं हा प्रताप केलाय.
खरंच प्रवीण तरडेचा असा प्रामाणिक हेतू होता तर त्यानं गणपतीच्या डोक्यावर संविधान ठेवायचं होतं...संविधान-भक्तांनीही मग तरडेला डोक्यावर घेतला असता.
मात्र, तरडे भासवत आहे तेव्हढा तो साधा सरळ निश्चितच नाही...त्याला ही कुठंतरी हे दाखवायचंच होतं 'काय अन कसलं तुमचं संविधान...आमच्या बाप्पाच्या पायाखालीच ना'.
'संविधान हे बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक' हे तरडेचं म्हणणं मात्र शंभर टक्के बरोबर कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र एक करुन बनविलेल्या संविधानाच्या मसूद्या वर भारतातील सर्व प्रांतातून आलेल्या विविध राजकीय पक्षाच्या तीनशेहून अधिक प्रतिनिधींनी जवळजवळ तीन वर्षं साधक-बाधक चर्चा करुन हे संविधान निर्माण केलंय.
मात्र, *गणपती ही बुद्धीची देवता या तरडेच्या म्हणण्याला आधार काय ?* संबंध पुराणातील असा कोणता दाखला तरडे देवू शकतात ज्यानं त्यांच्या या फालतू दाव्याला बळकटी मिळेल ? मुळातच, गणपतीचं शिर त्याचं स्वतःच नाही मग बुद्धी त्याची कशी...अन एव्हढा बुद्धीमंत हत्ती मारला तरी कसा गेला ?
गळ्यात साप गुंडाळून मसणजोग्याच्या *गेटअप* मध्ये वावरणारे गणपतीचे वडील शंकर याच्या अंगात जानवं नाही मात्र गणपतीला जानवं आहे असं का ? शंकरापेक्षा गणपतीला बुद्धी जास्त होती म्हणून...?
पारबता मायला तर जानवे घालायची सोयच नव्हती कारण सर्वच महिलांची जात ही वेगळीच, वर्णाश्रमापलीकडंची...
खरंतर, अंगावरील मळाने जिवंत माणूस निर्माण करणारी पारबता मायच अधिक बुद्धिमान नव्हे का ?
माणसाच्या धडावर हत्तीचं मुंडक कसं बसवलं याचा निकाल महामहिम मोदीनी देवून टाकलाय...त्याकाळी भारतात प्लास्टिक सर्जरी व्हायची अन ती करुनच *मुंडीकट गणपतीला* हत्तीचं मुंडके लावलं गेलं असं त्यांनी एका हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी जाहीर केलंय...परंतु, एखाद्याच्या शरीरावरील जमलेल्या मळाने जिवंत बाळ कसं निर्माण करता येतं याचा शोध मोदीच्या पितरांना तरी घेता येईल का ?
बरं, इथं *'आठ बाय आठ'* च्या झोपड्यांत राहणाऱ्या महिलांही रोजच्या रोज आंघोळ करतात मग कैलास पर्वतांची रांग च्या रांग मालकीची असलेल्या कैलासवासी पारबता माय नी अंगावर खंडीभर मळ साचे पर्यंत आंघोळ करु नये याला काय अर्थ ...बरं, अतीथंडी मुळे म्हणावं तर तिच्या वेशभूषेवरून तर वाटत नाही तसं.
आंघोळ करताना कोणी पाहू नये यास्तव राखणदार म्हणून आपल्या मळाचा तिनं गणपती बनवला म्हणताय तर *अंगावरील मळ काढताना पारबता माय ची राखण कोणी केली ?* अंगावरील सर्वात जास्त मळ हा पाठीवर असतो अन तो काढण्यासाठी मदतनीस तर लागतोच हा अनुभव तरडेला नसावा असं होवू शकत नाही...
बुद्धीच्या देवतेच्या गप्पा हासडणारा प्रवीण तरडे वरील प्रश्नांची उत्तर देवू शकेल का ?
कुठल्याही सामान्य माणसाच्या बुद्धीला गणपतीच्या जन्माची ही कहानी पटू शकत नाही... *धर्माचा गांजा ओढलेल्याची बात और आहे म्हणा...*
खरंतर, सद्सदविवेक बुद्धीने पाहिलंतर *गणपती ही तद्दन माठ संकल्पना* परंतु टिळकानी ती बाजरात आणल्यामुळे ती झालीय बुद्धीची देवता...अन घातलं गेलंय त्याला जानवं...कारण बुद्धी म्हटली की ब्राह्मण...असं त्यांनीच ठरवलंय...बस्स बाकी काही नाही.
संविधान-भक्तांनीही हा भक्तीचा मार्ग सोडून संविधानात नक्की काय नमूद आहे अन देशांत घडतंय काय याकडे लक्ष दिलं तर कळेल की *मोदी अन त्याची आर.एस.एस ची गँग* राजरोसपणे संविधानाची विटंबना करताहेत. संवैधानिक मार्गानंच संविधानाची वासलात लावून त्याजागी मनुस्मृती आणण्यासाठी धडपडताहेत. सरकारी उद्योगधंद्याचं खाजगीकरण करुन नोकऱयातील आरक्षण तर नवीन शालेय धोरणांतून शैक्षणिक आरक्षण बाद करुनही टाकलंय त्यांनी...संविधानातील कलमांना हात न लावता.
आर.एस.एस च्या ताटाखालचं मांजर झालेला अन ' *निळ्या गणपतीचा* धनी' रामदास ज्या वास्तूत राहतो..उठतो..बसतो..लोळतो ... प्रातःविधी...सायं:विधी करतो त्या वास्तुलाच *संविधान* म्हणतोय ...ही पण रामदासने संविधानाची त्याअर्थी केलेली विटंबना नाही का ?
विख्यात आंतराष्ट्रीय साहित्यिक मुल्क राज आनंद यांच्या बरोबर कफ परेड, कोलाबा येथे 1950 साली बाबासाहेबांच्या संभाषणाचा *मतितार्थ -* _स्वतःच्या उध्दारास्तव राम, विष्णूवतार ई. जातीयवादी नायक व हिंदुत्वाच्या इत्तर भावना निकालात काढा...संविधानाने धर्मनिरपेक्ष, समाजवादी-लोकशाही चा पुरस्कार केलाय...मात्र, इत्तर सभासदांच्या हेकेखोरपणामुळे 'काम करण्याचा अधिकार' हा मूलभूत अधिकारात समाविष्ट करता आला नाही...संविधानातील स्वातंत्र्याचा अर्थ धनिकांनी (भांडवलदारांनी) श्रमिकांना लुटण्यासाठी मुभा असा लावला आहे...भांडवलशाही म्हणजे खाजगी मालकांची हुकूमशाही होय...जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य अन आनंदी जगणं हे स्वप्नंच राहू नये म्हणून नव-तरुणांनी सतत संघर्षरत रहावं...संविधानात योग्यतो बदल करावा..._*असा आहे.*
प्रवीण तरडेच्या बावळटपणा निमित्तानं संविधानाचा विषय निघाला म्हणून सांगावसं वाटतं की, तरुणांनी संविधानाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करत सध्यस्थितीचे अवलोकन करून देशावर पसरलेल्या अवकळेतून मार्ग काढणं ही प्राथमिक गरज आहे. नाहीतर, तरडेसारख्यांना शिव्या घालण्याचं (अत्यंत सोप्पं असं), काम करुन त्याचे वीडियोज पसरवून मर्दानगीचा आव आणत...स्वतःचा अहंभाव कुरवाळण्यापलीकडं काहीही हशील होणार नाही...
मिलिंद भवार
_पँथर्स_
9833830029
24 ऑगस्ट 2020
_*टीप : वरील पोस्ट पटली असल्यास प्रविण तरडेच्या 'थोबाड पुस्तकाच्या' (fb) भिंतीवर ती चिकटवून टाकावी ही नम्र विनंती...*_
टिप्पण्या