प्रकाश आंबेडकर तिसरा पर्याय

महाराष्ट्रातील तिसऱ्या राजकीय स्पेसच्या नवनायकाचे नवयान!

 कुणाला पटो न पटो पण प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी राजकारणाला (आणि अपरिहार्यपणे अवघ्या साचेबद्धध राजकारणाला) नवं वळण दिल आहे. आतापर्यंत या प्रवाहाने आपले वेगळेपण जपत राजकारण करवयचा प्रयत्न केला, मात्र मेन्स्ट्रीम होत सत्ताधारी बनायचं असेल तर आपली वेस ओलांडावीच लागेल हे साधं सत्य बाळासाहेबांना उमगलं आहे (जे अगदी काँग्रेससह भल्या भल्या डाव्या, समाजवादी मंडळींनी नजरेआड केलं). प्रकाश आंबेडकर यांच्या या आंदोलनानंतर आता आंबेडकरी युवक, चळवळी आणि विचारवंतांना आपलं अस्तित्व आणि राजकारणाची फेरमांडणी, पुनर्विचार करावा लागेल. तो न करण्याचा पूर्ण अधिकार त्यांनां आहे, पण मग डाव्यांसारखं आपलं वैचारिक शुद्धत्व जपत बाजूलाच बसावं लागेलं.

हिंदू धर्म व हिंदुत्वाचा आधार हा obc आणि  हिंदू मागासवर्गीय समाज राहिला आहे, प्रस्थापित हिंदुत्ववादी पक्ष- संघटनांकडे हा वर्ग ढकलला जात आलाय. या outgoing ला थांबवून जर हिंदूंना नेतृत्व म्हणून आंबेडकर मिळत असतील, तर हाही प्रयोग व्हायला काहीच हरकत नाही. 

यात बाळासाहेबांची विचारसरणी, बौद्ध असणं यानं काही फरक पडत नाही. प. बंगालमध्ये कम्युनिस्ट राजवटीत दुर्गा पूजा साजरे करणारे हिंदू सुखनैव राहू शकतात, जवळपास नास्तिक असलेले शरद पवार विठोबाची शासकीय पूजा करून शिवाय राज्याचे नेतृत्व बनू शकतात तर उगाच राजकीय शुद्धतेच सोवळं एकट्या प्रकाश आंबेडकरांनाच नेसवण्याचा आत्मघाती खटाटोप पुरोगाम्यांनी करू नये (इतरवेळी हेच लोक देव मानत नाही हे असणंही मिरवणार आणि आषाढीमध्ये विठ्ठल विठ्ठल करत हिंदूपणाही दाखवणार, गणपतीत घरातले गणपतीचे फोटोही दाखवणार ). 22  प्रतिज्ञाची आठवण करून देत ज्यांना प्रकाश आंबेडकरांची कोंडी करायची आहे, त्यांनी हेही लक्षात घ्यावे की, मान्य करणे आणि मान देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विठ्ठलाचे दर्शन हा मान देण्याचा भाग आहे. तसाच, जसा कुणीही सहिष्णू धार्मिक माणूस बोधिसत्व गौतम बुद्धधांना मान देईल. (त्यातही आंबेडकरांनी आंदोलनासाठी विठ्ठल हे दैवत निवडणे, हा एका वेगळ्या सांस्कृतिक आकलनाचा भाग आहे)

काँग्रेस राष्ट्रवादीने डावं राहायचं आणि सेना-भाजपनं हिंदुत्व वाटून घ्यायचं, जोडीला जो जमेल तशी वैचारिक इष्कबाजी करणार, या गेल्या 6 दशकांच्या वाटणीला प्रकाश आंबेडकर उध्वस्त करू शकतात. केजरीवालांनी जे दिल्लीत करून दाखवलं ते इथे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर करू शकतात. याची वैचारिक आयुधं साक्षात बुद्ध धर्मातील  प्रतीत्यसमुत्पाद, अनित्यवादाने दिली आहेत, त्यासाठी वैचारिक कोलांटूड्या मारायची त्यांना गरज नाही आणि ज्यांनी आयुष्यभर अशा उड्या मारल्या त्यांनी ही शिकवणी द्यायची तर नाहीच नाही!

महाराष्ट्रातला तिसरा राजकीय स्पेस तो हा असाच असणार आहे!

जय भीम!

(जाता जाता- एक गमतीदार गुंता पाहा-

हिंदुत्ववादी एकीकडं दशावतारात बुद्ध घेण्याचा प्रयत्न करणार मात्र प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात जायचं म्हटलं की 22 प्रतिज्ञांची आठवण करून देणार!!

पुरोगामी हे कट्टर मुस्लिम अशा औरंगजेबाच्या दोन चार पत्राचा दाखला देत त्याच लिबरल असणं सांगणार, आणि असाच लिबरलपणा प्रकाश आंबेडकरांनी दाखवला की बाळासाहेबांचं बौद्ध असंण काढणार!!!

अरे बाबांनो 1500+200+100= किती?)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे