पंढरपुर येथील आंदोलन

प्रकाश आंबेडकर आणि पंढरपूर मंदिर आंदोलन..
1)आंबेडकरी चळवळीचे जे राजकारण आहे, त्याच्या काही मर्यादा आहेत. अनुसूचित जाती किंवा त्यातील नवबौद्ध चळवळीच्या केंद्रस्थानी आहेत. राजकारण हे बहुमता नुसार चालते. अनुसूचित जातीची लोकसंख्या संपूर्ण भारतात 16.4% आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी जे बहुमत लागते त्याची सतत कमतरता जाणवते. 
2)जोपर्यंत ओबीसी आणि आदिवासी लोकांना सोबत घेत नाहीत तोपर्यंत आंबेडकरी राजकारणाला यश येणार नाही.
3)देव धर्म किंवा हिंदू धर्म सोडण्याची ओबीसी लोकांची मानसिकता तयार करणे अवघड आहे हे मागील सत्तर वर्षात सिद्ध झाले आहे. त्यामुळे ओबीसी लोकांची मानसिकता न बदलता राजकारण करता येऊ शकते का ? त्याचा प्रयोग प्रकाश आंबेडकर करत आहेत.
4)जानवेधारी हिंदू आणि बिगर जानवेधारी हिंदू यामध्ये त्यांनी फरक केला आहे. हा ऐतिहासिक फरक आहे. जानवेधारी हिंदूंचे देव हे वेगळे आहेत. जसे ब्रह्मा, विष्णू, ईंद्र इत्यादी..या वैदिक देवांची पूजा बिगर जानवेधारी हिंदू करत नाहीत. तर हा जो बिगर जानवेधारी वर्ग आहे त्याला वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र म्हणतात. वर्ण व्यवस्थेनुसार त्यांचा उपनयन संस्कार होत नाही. म्हणून ते जानवे घालू शकत नाहीत. तर हा जो शूद्र वर्ग आहे हा वैदिक ब्राह्मणांच्या देवाला मानत नाही. हा तुळजापूरच्या भवानी मातेला , जेजुरीच्या खंडोबाला किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाला मानतो. वैदिकांचे देव गोरे आहेत तर अवैदिकांचे(शूद्रांचे) देव काळे आहेत. वैदिकांच्या देवांचा पत्ता नाही जसे ब्रह्मा आकाशात, विष्णू समुद्रात, इंद्र स्वर्गात, या वैदिक देवांना पोस्टाचा पत्ता नाही. तर अवैदिकांच्या किंवा बिगर जानवेधारी हिंदूंच्या किंवा शूद्रांच्या देवांना पोस्टाचा पत्ता आहे. जसे जेजुरी ला खंडोबा, पंढरपूरला विठ्ठल, तुळजापूरला आई भवानी यांना पोस्टाचा पत्ता आहे.
5) ह्या दोन हिंदू मधील भेद ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. जानव्या विरोधात जर बिगर जानवेधारी एकत्रित येत असतील तर ही बाब चळवळीसाठी पोषकच आहे.
6)ज्या मंदिरात हजारो वर्षे अस्पृश्यांना बंदी होती त्या मंदिर आंदोलनात अस्पृश्य जातीतील व्यक्ती नेतृत्व करत आहे, हा बदल सुद्धा क्रांतिकारकच आहे.
7)ही सर्व मंदिरे कधीकाळी विहारच होती हे सुद्धा बौद्धांनी  लक्षात ठेवले पाहिजे.
8)हिंदू राजकारणी जय-भीम म्हणतात तेव्हा खरच त्यांना भीमाचा जय अपेक्षित असतो का ? हे सर्व राजकारणासाठी केले जाते. प्रकाश आंबेडकर जर अशा प्रकारचे राजकारण करत असतील तर आंबेडकरी समाजाने नेत्यांना विरोध केला नाही पाहिजे. राजकारणात या गोष्टी कराव्या लागतात हे समजले पाहिजे.
9)समाजकारणातील नेतृत्वाने आणि राजकारणातील नेतृत्वाने वेगवेगळी भूमिका घेणे अपेक्षितच आहे. या भूमिकेतील भेद समजून घेतला पाहिजे. जसं कुणी जय भीम म्हणतो म्हणून आंबेडकरवादी होत नाही तसेच मंदिर आंदोलन केल्याने कोणी हिंदू होत नाही.
10)सत्ता प्राप्त करण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतील. ज्यांना हक्काची सत्ता प्राप्त करायची नाही त्यांना राजकारण कशासोबत खातात हे सुद्धा समजत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे