मनसेच्या वतीने किनगावात रास्ता रोको
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक किनगांव येथे रास्ता रोको
लातुर प्र. किनगाव येथे मनसेच्या वतिने शेतीपंपाची विजबिल माफी व ऐन काढणीच्या वेळी पावसाने झालेली सोयाबीनची नुकसान भरपाई पहाणी करून शेतकऱ्यांना देण्यात यावी . याविषयीचे निवेदन महसुल प्रशासन व पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसींग भिकाने , जिल्हा उपाध्यक्ष राजीव मोहगावकर , भुजंगराव उगीले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची लाऊडाऊनच्या काळातील विज बिल माफ करण्यात यावे , व तसेच ऐेन काढणीच्या काळात पावसाला सुरवात झाल्याने हातात आलेले सोयाबिनचे पीक हातातुन गेल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० अनुदान देण्यात यावे या मागणी साठी किनगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिह भिकाने , जिल्हा उपाध्यक्ष राजीव मोहगावकर भुजंगराव उगीले ,डॉ . मिलींद साबळे तसेच संतोष रोडगे यांनी आंदोलनाची भुमीका स्पष्ट केली , यावेळी मनसेचे कुमार देशपांडे , विकास वाघमारे संतोष रोडगे कृष्णा जाधव यांच्या वतीने अहमदपुर तहसीलचे तहसीलदार पेद्देवाड तसेच स . पो. निरीक्षक के एन चव्हान यांना निवेदन देण्यात आले
त्रिशरण वाघमारे पि एन मराठी न्युज लातुर
टिप्पण्या