शिवक्रांती युवा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी भुजंग उगीले यांची निवड
शिवक्रांती युवा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी भुजंगराव उगीले
लातुर (प्र. त्रिशरण वाघमारे ) लातुर जिल्हयातील सामाजीक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवनारे अहमदपुर तालुक्याचे भुमिपुत्र भुजंगराव उगीले यांना शिवक्रांती युवा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री उगीले यांनी जनसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान करत वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना हात जोडत तर कधी हातचा दाखवत सामान्यांचे प्रश्न मार्गी लावल्याने फक्त तालुक्यातच नव्हे तर जिल्हयातील सामाजीक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या या कार्याची दखल घेत शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. दत्तात्र्य काळे यांनी शिवक्रांतीच्या मराठवाडा अध्यक्षपदाची जबाबदारी श्री. उगीले यांच्यावर सोपवली. यावेळी बोलताना ते म्हणाले की मा. काळे साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत समाजाच्या हितासाठी आम्ही सदैव तत्पर राहु . त्यांच्या या निवडीबद्दल ओम भाऊ पुणे , राजीव मोहगावकर , कुमार देशपांडे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
टिप्पण्या