मुत्युनंतरचा संघर्ष रुग्ण हक्क संघर्ष समितीने सोडवला

*मृत्यू नंतरचा संघर्ष रुग्ण हक्क संघर्ष समितीने सोडवला.. लातुरातील हॉस्पिटल मधील निंदणीय घटना*
प्र.लातुर ( त्रिशरण वाघमारे ) आज दि.22 सप्टेंबर 2020 रोजी चंपाबाई नागरगोजे वय 75 वर्षे हे लातुर येथील लोकमान्य अतिदक्षता केंद्र या रुग्णालयात उपचारा दरम्यान मयत झाल्या पैश्या अभावी मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यासाठी रुग्णालयाने नकार दिला म्हणून रुग्णांचा नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समिती लातुर यांचेकडे मदतीची साथ मागितली त्या अनुषंगाने रुग्ण हक्क संघर्ष समितीचे *ॲड. निलेश करमुडी , प्रशांत चव्हाण , संजयकुमार सुरवसे , हणमंत गोत्राळ,विश्वास कुलकर्णी , रवि बिजलवाड, संतोष सोनवणे , सिद्धु वाडकर, यांनी* तात्काळ लोकमान्य अतिदक्षता केंद्र येथे भेट दिली तिथे गेल्यावर पैश्या अभावी रुग्णालय मृतदेह ताब्यात देत नव्हते व हॉस्पिटलचे बिल हे नियमाप्रमाणे नव्हते व संबंधित रुग्णाची फाईल पण दाखवत नव्हते अशि सत्य परिस्थिती लक्षात आली आसता नेमका हा काय प्रकार आहे हे विचारण्यासाठी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे ॲड. निलेश करमुडी यांनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करणेकरीता डॉक्टरांना बोलवा अशी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली असता सुमारे दोन तासानंतर संबंधित डॉक्टर व आय एम ए चे पदाधिकारी सदर रुग्णालयात आले व कोणाशिच चर्चा न करता पोलिसांना पाचारण केले व पोलिस प्रशासनहि रुग्णालयात दाखल झाले तरीही संबंधित डॉक्टर हे चर्चा करणेसाठी समोर येत नव्हते म्हणून रुग्ण हक्क संघर्ष समितीने पोलिसांनाच विनंती केली कि डॉक्टरांनी चर्चेसाठी बोलवा तरीहि कोणिच डॉक्टर सत्य सांगणेकरीता पुढे येईणात म्हणून रुग्णांचे नातेवाईक हे प्रचंड मानसिक तणावात आले होते म्हणून रुग्ण हक्क संघर्ष समिती, पोलिस प्रशासन यांनी समन्वय घडवून आणला व रुग्ण हक्क संघर्ष समिती पोलीस प्रशासन , रुग्णाचे नातेवाईकांनी जमेल तसे मदत म्हणून रक्कम जमा करुन रुग्णालयाचे बिल देय केले व उर्वरीत बिल हे आय एम ए देय करेल अशि ग्वाहि आय एम ए ने दिली असाहि समन्वयाचा लातुर पॕटर्ण करोनाचा काळात रुग्ण हक्क संघर्ष समितीने घडवून आणला व रुग्णांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवुन होणारा वाद सामजंस्याने मिटवुन शेवटी मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यासाठी रुग्णालयास भाग पाडले या विधायक कार्यामुळे रुग्णांचा नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या सर्व टिमचे आभार मानले....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे