अहमदपुर गोदामपाल यांची चौकशी करा अन्यथा अमरण उपोषण - राजीव मोहगावकर

अहमदपूर प्रतिनिधी, अहमदपूर येथील शासकीय धान्य गोदामातील धान्य साठ्याची चौकशी करून संबंधित गोदामपालावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजीव मोहगावकर यांनी उप विभागीय अधिकारी कार्यालय अहमदपूर समोर आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदनाद्वारे उप विभागीय अधिकारी अहमदपूर यांना कळविले आहे.
या बाबत सविस्तर असे की, सामाजिक कार्यकर्ते राजीव मोहगावकर यांनी शासकीय गोदामात धान्याचा अपहार होत असुन धान्याचा प्रत्येक गोनीतून ४ ते ५ किलो धान्य काढून घेऊन ते धान्य काळ‍‍‍या बाजारात विकले जात असुन, निवेदनात गोदाम पालाच्या संपत्तीची ही चौकशी करण्यात यावी , धान्य साठ्याची चौकशी करण्यात येऊन संबंधित गोदाम पालावर शासनाची फसवणूक, जनतेच्या धान्याचा अपहार, व जीवन वस्तू अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी व देश्याची संपत्ती लुटणाऱ्या देशलुटारूवर देशद्रोहाचे ही गुन्हे दाखल करावीत अशी मागणी राजीव मोहगावकर यांनी तहसीलदार अहमदपूर यांना लेखी निवेदनाद्वारे दि. ५/८/२०२० रोजी केली होती, परंतु संबंधित तहसील प्रशासनाने अद्याप कसलीही कार्यवाही केली नसल्याने राजीव मोहगावकर यांनी उप विभागीय अधिकारी अहमदपूर यांना लेखी निवेदन देऊन कारवाई च्या मागणी साठी दि.२८/०९/२०२० रोजी उप विभागीय अधिकारी कार्यालय अहमदपूर समोर आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे