धनगर समाजाचे किनगाव ग्रामपंचायत समोर "ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन"

धनगर समाजाचे ग्रामपंचायत समोर "ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन"

 त्रिशरण वाघमारे
अहमदपुर प्रतिनिधी 

अहमदपुर दि. 25 येथील धनगर समाजाचे ग्रामपंचायत कार्यालय च्या समोर ढोल वाजवून ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत चे सरपंच किशोर मुंडे,ग्रामविकास अधिकारी आर.जी कांबळे यांना निवेदन देऊन धनगर समाजाच्या भावना महाराष्ट्र सरकार ला कळवावे अशी मागणी करण्यात आली,
महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही,असे दिसत आहे.त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आज महाराष्ट्रभर "ढोल बजाओ...सरकार जगाओ..." आंदोलन करण्यात आले.सरकारने लवकरात लवकर ST चा दाखला द्यावा व धनगर समाजाची न्यायालयात चालू असलेल्या याचिकेला चांगल्या वकिलांची नेमणूक करावी व याचिका जलद गती कोर्टात चालवावी.मागील सरकारने जे आदिवासींना तेच धनगर समाजाला या तत्वावर दिलेले एक हजार कोटी त्वरीत द्यावे ही मागणी निवेदनात करण्यात आली , यावेळी धनराज गिरी, शिवराज भुसाळे ,त्रिशरण वाघमारे,बाळू देवदे,यांनी मनोगत व्यक्त केले,
यावेळी,ज्ञानोबा देवदे,नामदेव धरणे,राजू हांडे,भागवत डिगोळे,अर्जुन दिंडगे,सोपान देवदे,रोकडोबा भुसाळे,मोहन बने,भरत डिगोळे,गोविंद कोरळे,व्येंकट डिगोळे,गजानन एनकफळे,किरण बने,असलम शेख,गोरख भुसाळे,चेतन देवदे,वैभव कुलकर्णी उपस्थित होते,यावेळी जाकेर भाई कुरेशी यांनी जाकेर भाई मित्र मंडळाच्या वतीने धनगर आरक्षण ला पाठिंबा देण्यात आला,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे