महात्मा फुले महाविद्यालय किनगाव येथे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी

*किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयात शहिद भगतसिंग यांची जयंती साजरी* 
किनगांव ( प्रतिनिधी )अहमदपूर तालुक्यातील किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवार दि 28 सप्टेबर रोजी शहिद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव प्रा डॉ बी आर बोडके , होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ भारत भदाडे ,कार्यक्रमाधिकारी प्रा बालाजी आचार्य , प्रा संजय जगताप, प्रा. अनंत सोमवंशी, कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे , उध्दवराव जाधव, प्रा बी व्ही पवार , प्रा डॉ दर्शना कानवटे, याची होती यावेळी संस्था सचिव प्रा डॉ बीआर बोडके यांनी शहिद भगतसिंग याच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन विनम्र ञीवार वंदन केले आणि मार्गदर्शन करताना क्रांतीकारी शहिद भगतसिंग उत्तम दृष्ट्रे होते वयाच्या चोविसाव्या वर्षी हसत हसत देशासाठी फासावर जाऊन प्रखर देशभक्त ठरले त्याच्यामुळेच स्वातंत्र्याची
चळवळ प्रखर होऊन देशाला स्वातंत्र्य मिळाले सुखदेव ,राजगुरू, भगतसिंग हुतात्म्याना विनम्र वंदन करतो असेही म्हणाले या प्रसंगी प्रा पदमा हागदळे, प्रा पांडूरंग कांबळे ,प्रा प्रभाकर स्वामी ,प्रा सदाशिव वरवटे, प्रा बळी कासलवार , प्रा डॉ अंबादास मुळे,ज्ञानेश्वर खिडसे, उमेश जाधव, अनिल भदाडे, किशन धरणे, शिवाजी हुंबाड, आखिल शेख यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी रासेयोचे विद्यार्थी कु गणपत कांबळे , कु राम मेंदे,कु दिपाली येगाडे, कु कल्याणी सोमवंशी , कु गीताजंली जाधव यांनी परिश्रम घेतले तर रासेयो स्वयंसेविका कु गीता पोटफोडे हिने संचालन केले आणि शेवटी आभार कु सुप्रिया धुळे हिने मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे