मनपा कर्मचाऱ्यांसाठी वंचित आघाडी आक्रमक

मनपाचे 83 कर्मचारी सेवेत कायम करण्यासाठी वंचितचे निवेदन
त्रिशरण वाघमारे लातुर : दिनांक ७/९/२०२० रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने म.न.पा.मधील ८३ रोजंदारी कर्मचार्यांना मा.सर्वोच न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे कायम स्वरूपी सेवेत समावून घेऊन त्या संबंधीचे सर्व लाभ देण्या करिता निवेदन देण्यात आले 
                                            सन २०१८ मध्ये मा. सर्वोच न्यायलयाने सदरील रोजंदारी कामगारांना कायम करून घेण्याचा आदेश दिलेला असतानाही आज तागायत म.न.पा लातूर कडून सदरील कर्मचार्यांना कायम करून घेतलेले नाही सदरील कर्मचारी २५ वर्षा पासून सेवेत शहरात साफसफाई काम करत असताना त्यांच्या वर हा मोठा अन्याय झालेला आहे आज रोजी त्यांच्यावर उपास मारीची वेळ आलेली आहे तसेच मा.सर्वोच न्यायालयचा आदेश असताना हि सदरील आदेश डावलण्याचे धाडस म.न.पा. कडून कोणाच्या सांगण्यावरून होत आहे याचा जाब आयुक्तांना विचारण्यात आला. सदरील कर्मचारांची मा.पालक मंत्र्यांनी कधीच दखल घेतलेली दिसत नाही म.न.पा. वर कॉग्रेस तसेच भाजपचीहि सत्ता असताना कोणीही दखल घेतलेली नाही या काळात बर्याच कर्मच्यार्यांचा मृत्यू झालेला असताना हि कोणालाही याची दाखल घ्यावी वाटत नाही हि बाब अतिशय निंदनीय आहे. सदरील कर्मचारी हे मागासवर्गीय व अल्पसंख्याक असल्या कारणाने त्यांच्यावर अन्याय झालेला आहे असे निदर्शनास येते. या घटनेची वंचित बहुजन आघाडी ने दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोषभैय्या सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात कर्मचार्यांना ७ दिवसाच्या आत कायम करून घेण्यासाठी मा. म.न.पा.आयुक्त लातूर व मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे व मा. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी १५ दिवसाच्या आत सदरील कर्मचार्यांना कायम करून घेण्याचे आश्वासन दिले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे, अमोलभैय्या लांडगे, adv.जितेंद्र सातपुते, adv.सर्फराज पठाण, प्रा.सतीश कांबळे व म.न.पा.तील अन्याय ग्रस्त कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे