कोवीड सेंटरच्या दरात कपात करण्याची रुग्ण हक्क . संघर्ष समितीची मागनी अन्यथा आंदोलन
*खाजगी कोविड सेटंरचे शासकिय दर आणखीन कमि करावेत* ..
प्र.लातुरः- खाजगी कोवीड सेंटर साठी शासनाने चार हजार ते नऊ हजार असे दर ठरवुन दिले आहेत परंतु हे दर सुद्धा सामान्यांना परवडनारे नाहीत त्यामुळे या दरामधे आणखी कपात करण्यात यावी अशी मागणी रुग्ण हक्क संघर्ष समिती कडुन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे व त्यातच करोना साथरोगाचे प्रमाणही वाढले आहे. सरकारणे खाजगी कोविड 19 हॉस्पिटल्स मध्ये उपचारसाठी शासकिय शुल्क नियमावली जाहिर केली आहे. हे शासकिय शुल्क हे जास्तीचे आहेत ते सरकारणे आणखीन कमी करुन रुग्णांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन रुग्ण हक्क संघर्ष समितीचे *जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली समितीचा शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन सविस्तर चर्चा करुन मागणी निवेदनाद्वारे केली.* खाजगी कोविड सेंटर मध्ये शासनाने शासकिय दर निर्धारीत केले आहेत हे दर दररोज 4000 रु पासुन ते 9000 रु. पर्यत आहेत *या शासकिय दराप्रमाणे कमित कमि चौदा दिवसाचे शुल्क हे लाखाचा पुढे जाते. हे दर सर्वसामान्यानां परवडणारे नाहित* म्हणून सदरील दर हे आणखीन कमि करुन रुग्णांना दिलासा देणारे अत्यंत माफक दर शासनाने निर्धारीत करावेत व रुग्णांणा दिलासा द्यावा . *तसेच सर्वच खाजगी हॉस्पिटल्सची तपासणी मोहिम राबवुन दोषी आढळणाऱ्या लुटारु हॉस्पिटल्सची नोंदणी हि कायमची रद्द करावी* व रुग्ण लुटीस प्रतिबंधक घालावा अशि मागणीहि करण्यात आली जिल्हाधिकारी साहेबांनी या गंभिर समस्येची दखल घेऊन शासनास याबाबत सुचवावे व रुग्णहितार्थ न्याय द्यावा अन्यथा रुग्ण हक्क संघर्ष समितीचा वतीने तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला या समितीच्या शिष्टमंडळात समितीचे *ॲड. निलेश करमुडी, संजयकुमार सुरवसे, विश्वास कुलकर्णी, श्रीकृष्ण डाळे, प्रशांत चव्हाण, रविराज घोडके, विशाल होके, सौ. मिनाक्षीताई शेटे,ज्योतीताई मारकडे,प्रगती डोळसे, प्रा. शंकरराव सोनवणे, संतोष सोनवणे, बळिराम चाटे* आदि पदाधिकारी सहभागी होते
टिप्पण्या