वंचित बहुजन आघाडी उदगीरच्या वतिने विविध मागण्यांचे निवेदन - जिल्हा प्रवक्ता डॉ. संजय कांबळे
निवेदन
प्रति,
उपजिल्हाधिकारी साहेब ,
उपविभागीय कार्यालय, उदगीर
विषय :- खालील मागण्या संदर्भात निवेदन.
महोदय,
वरील विषयास अनुसरुन विनंती की, वंचित बहुजन आघाडी च्या वतीने खालील मागण्याचे निवेदन सादर करीत आहे.
१ ). उदगीर तालुका व शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांची सर्वे करुन ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा आहे. परंतु घर नाही अशा लोकांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा.
२). शहरातील व ग्रामीण भागातील लोकांकडे राशनकार्ड नाही अशा लोकांना त्वरित राशनकार्ड वितरित करण्यात यावे व ज्यांच्या कडे नाही अशा लोकांना व आहे अशा लोकांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत राशन देण्यात यावे.
३). उदगीर तालुक्यातील व शहरातील त्वरित डी. आर. डी चा सर्वे करण्यात यावा.
४). उदगीर तालुक्यातील ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा व पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी.
५). शेतकऱ्यांना पिक विमा लवकरात लवकर मंजूर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावा.
६). मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून सर्व समावेशक दंड आकारण्यात यावा .
७) . कोरोना महामारीमुळे लोकांना काम नसल्यामुळे नगरपरिषदेने राबविलेली सक्तीची घरपट्टी व नळपट्टी माफ करुन त्यांना दिलासा द्यावा .
वरील मागण्या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करुन शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांना न्याय देण्यात यावा. वेळेत वरील मागण्या मान्य नाही झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
डॉ. संजय कांबळे
जिल्हा प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी लातुर
9823152650
पी. डी. कांबळे, बालाजी कांबळे, मझहर पटेल, हामिद शेख, शशिकांत कल्लुरकर , आदी कार्यकर्ते उपस्थित होते..
टिप्पण्या