रुग्ण हक्क संघर्ष समिती स्थापन

रुग्णांच्या मदतीचा लातुरकरांनी घेतला ध्यास रुग्ण हक्क संघर्ष समीती स्थापन

त्रिशरण वाघमारे  : कोरोनाच्या काळामधे डॉक्टरांनी चालवलेली लुट कोरोनावर कुठलाही इलाज किंवा कोरोनासाठी स्पेशल औषध उपलब्ध नसल्याने व मिडीयाने कोरोनाची भयंकर भिति निर्माण केल्याने सामान्य नागरीक भयभीत झाले होते व डॉक्टरांनी आकारलेल्या अव्वाच्या सव्वा बिलानी त्रस्त झाले होते . ही बाब जेव्हा लातुर येथील नामांकित विधीज्ञ असले तरी सामाजीक कार्यात हिरहिरीने भाग घेऊन जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत धडपडणारे अँड निलेश करमुडी यांच्या आणि त्यांच्या सहकारी मित्रांच्या चर्चेतुन रुग्ण हक्क संघर्ष समिती स्थापन करण्याची संकल्पना उदयास आली. या सर्वांनी मिळून त्या संकल्पनेस मुर्त स्वरूप दिले समिती स्थापन झाली. समीतीच्या कोअर कमिटीमधे अँड. निलेश करमुडी , प्रशांत चव्हान, संजयकुमार सुरवसे, अँड. तिरुपती शिंदे , अँड. विजय पंडीत , गंगाधर विसापुरे आणि सौ मिनाक्षी ताई शेटे या सर्वांचा समावेश आहे . ही रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या अन्याया विरोधात आवाज उठविनार आहे .   या समितीने आपलं पहिलं पाऊल टाकत लातुर जिल्ह्याची पहिली कार्यकरिनी जाहीर केली आहे यात हणुमंतजी गोत्राळ यांना लातुर जिल्हाध्यक्ष पदी तर संतोषजी सोनवने यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली . दि. 6 / 9 / २० रोजी समीतीची महत्वपुर्ण बैठक पार पडली यात निलंगा व अहमदपुर तालुक्याच्या अध्यक्षांसह लातुर जिल्ह्याची 35 जनांची कार्यकारीनी जिल्हाध्यक्ष हनुमंतजी गोत्राळ यांच्या सुचनेनुसार व कोअर कमीटीच्या सल्ल्याने आणि संमतीने जाहीर करण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान निलंगा तालुका बार असोसीएशनचे अध्यक्ष अँड . तिरुपती शिंदे यांनी भुषवले . तसेच कोअर कमीटी च्या सदस्यांनी नव निर्वाचीत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला . आणि समीतीच्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. सदरील बैठक कै. शिवलींग शिवाचार्य महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून सोशल डिस्टंसींग च्या नियमांचे पालन करूत पार पडली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे