बौद्ध स्मशानभुमी चिखलीची समस्या कधी सुटनार ?
चिखली स्मशानभुमीचा प्रश्न २००८ पासुन प्रलंबीत
प्रतिनिधी लातुर : मौजे चिखली,ता. अहमदपुर, जि.लातुर येथील बौद्ध स्मशान भुमीचा प्रश्न बारावर्षांपासून प्रलंबीत आहे. वेळोवेळी प्रशासनाला यासंबधि निवेदनाद्वारे व तोंडी माहिती देऊन आजतागायत प्रश्न सुटलेला नाही
याबाबतीत सवीस्तर वृत्त असे की, चिखली गावातील बौद्ध स्मशानभुमी ची वंशपरंपरागत बारा गुंटे जमीन आहे. परंतु आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी शेतीचे बांध प्रतिवर्षी थोडेथोडे पुढे सरकावत स्मशानभुमीच्या जमीनीवर अतिक्रमन करून आज त्याठीकाणी फक्त एकच गुंठा जमीन शिल्लक आहे. यासंबधी अहमदपुर तहसीलदाराना आजपर्यंत जवळपास आठ ते दहा वेळेस निवेदन देऊन यावर कोनतीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच सदरील स्मशानभुमीस जाण्यासाठीचा रस्ता यावर सुद्धा अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. यासंबंधी १० / ६ / २०१९ रोजी तहसीलदारांना निवेदन दिले असता तकालीन तहसीलदारानी येरे माझ्या मागल्या या म्हणी प्रमाणे चिखलीवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं. शेवटी गावकऱ्यांना केंद्रीय समाजकल्यान मंत्री रामदासजी आठवले यांच्याकडे धाव घ्यावी लागली. मा. आठवले साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र दिले.ते पत्र मा. जिल्हाधिकाऱ्यांना देऊन संबंधीत प्रकरणाकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावा अशी विनंती चिखली येथील संभाजी गायकवाड , समाधान भालेराव व अजय गायकवाड यांनी केली.
टिप्पण्या