अय्याज पठाण यांचे न.प. विरोधात अमरण उपोषण
न.प.अहमदपुर कर्मचारी श्री बिलापट्टे व उपजिल्हाधिकारी श्री शिवणे यांच्या विरोधात अमरण उपोषण
लातुर प्र. : पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे नमुना नं आठ अ रजिस्टरला घेण्यात आलेल्या नोंदी तत्काळ रद्द करून सदर नोंदी घेण्यास मदत करणारे न.प. अहमदपुरचे कर्मचारी व न.प. प्रशासन लातुर येथील कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी अहमदपुर येथील रहिवाशी अय्याज पठाण हे दि. 14/9 पासून अमरण उपोषणास बसले आहेत
याबाबत सविस्तर वृत्त असे की पठाण अय्याज यांनी दि.3/9 रोजी प्रशासनास लेखी निवेदन दिले की न.प. अहमदपुर चे कर्मचरि श्री सतिष बिलापट्टे यांनी अहमदपुर येथील मालमत्ता क्र. ए -291 ची नोंद बेकायदेशीर पणे पाच रुपयाच्या बाँड पेपरवर सन 2016 साली 1989 च्या रेकॉर्डला नोंद घेऊन नमुना नं८ अ तयार करून दिला . सदरचा नमुना नं८ अ बेकायदेशीर असल्याने तो रद्द करण्याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन ही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने न.प. कर्मचारी व प्रशासनाच्या विरोधात अय्याज पठाण दि.१४/९ पासून अमरण उपोषणास बसले आहेत . दरम्यान आठ दिवसाच्या काळात प्रशासनाने फक्त त्यांच्या कडे असलेले पुरावे दाखवले व पुन्हा कसलीच विचारपुस न केल्याची शोकांतिका पठाण यांनी यावेळी व्यक्त केली
टिप्पण्या