वंचित आघाडीचा 181 व्या दिवसा चा उपक्रम
* वंचित बहुजन आघाडी चा सलग 181 दिवस उपक्रम* मा पांडुरंग (काका) हुंडेकरी (माजी मंडळ अधिकारी)च्या हस्ते 13 गरजूंना धान्य किट चे वाटप करण्यात आले
उस्मानाबाद दि 8 ऑक्टोबर (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी मा पांडुरंग (काका) हुंडेकरी (माजी मंडळ अधिकारी) हस्ते .13 गरजू कुटुंबांना किराणा मालचे वाटप दि 8 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी च्यावतीने गरजू कुटूंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येत असून आजचा181 वा दिवस आहे. तर आजपर्यंत 3142 कुटूंबांना अन्नधान्य वाटप केले आहे.
वंचित बहुजन आघाडी , भारतीय बौद्ध महासभा, प्रबुद्ध कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संस्था, कामठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, उदगीर ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक दानशूर यांच्या सहकार्याने व मिलिंद रोकडे जीवन कदम सुरेश चौधरी विकास बनसोडे मार्गदर्शनाखाली हे वितरणप करण्यात येत आहे.या वाटपाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे सुरेश चौधरी,बाळासाहेब राऊत धनाजी भालेकर , कमलेश कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन शुकेशन ढेपे यांनी तर उपस्थितांचे आभार कृष्णा लोंढे यांनी मानले.
टिप्पण्या