महाराष्ट्राने गमावले दोन हॉकीपटू वडमारे परिवार आणि क्रीडा क्षेत्रावर पसरली शोककळा
महाराष्ट्राने गमावले दोन हॉकीपटू
रोहन रामभाऊ वाघमारे वय 18 रोहित रामभाऊ वडमारे वय सोहळा राहणार रामनगर औरंगाबाद हे दोघे भाऊ तीन दिवसापूर्वी आजी व मामांना भेटण्यासाठी टाकळगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे आले होते येथे आले असता फिरण्यासाठी म्हणून शेतात गेल्यावर मामाची मैस घेऊन तलावाकाठी फिरत असताना होण्याची इच्छा झाल्याने दोघेही तलाव तलावात उतरले परंतु दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की रोहन वडमारे आणि रोहित वडमारे राहणार रामनगर औरंगाबाद हे दोघे सख्खे भाउ महाराष्ट्राचे प्रसिद्ध हॉकीपटू आहेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असताना या दोघांनीराष्ट्रीय व राज्यस्तरीय सामन्यातून महाराष्ट्राला यश प्राप्त करून दिले आहे मामाच्या गावी फिरण्यासाठी आल्यानंतर मामाचे शेतात शेत बघण्यासाठी गेले असता शेताच्या बाजूस असलेल्या तलावात पोहण्याची इच्छा झाल्याने हे दोघे भाऊ तलावात उतरले परंतु पोहता येत नसल्याने दोघांचाही सोमवारी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची बातमी माहिती सिद्धार्थ कांबळे राहणार टाकळगाव यांनी पोलीस स्टेशन किनगाव कळविले असता पोलीस स्टेशन किनगाव चे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेताच्या शोधकार्यात सुरुवात केली यापैकी रोहनचे प्रेत सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लोकांच्या मदतीने तलावातून बाहेर काढण्यास पोलिसांना यश आले परंतु रोहित काही केल्या सापडत नव्हते मंगळवार दिनांक 20 रोजी अहमदपूर येथील अग्निशमन दलास पाचारण करावे लागले अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि जढाळा येथील कोळी समाजाचे चार नागरिक यांच्या मदतीने गळाच्या व काटेरी बोरीच्या पट्टीच्या साह्याने तलावात शोध घेऊन बऱ्याच प्रयत्नांती मंगळवारी दुपारी 12 40 च्या सुमारास रोहित मिळून आले दोन्ही प्रेतांचा पोलीस हेडकॉन्स्टेबल मुरलीधर मुरकुटे यांनी मरणोत्तर पंचनामा करून दोन्ही प्रेत प्राथमिक आरोग्य केंद्र सताळा येथे शवविच्छेदनासाठी पाठवले सदर शोध मोहिमेसाठी अहमदपूर तहसील चे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी मंडळ निरीक्षक दहिफळे तलाठी हंसराज जाधव पोलीस स्टेशन किनगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक के एन चव्हाण जमादार मुरलीधर मुरकुटे पोलीस गायक किशोर गोखले होमगार्ड कर्मचारी यांनी अथक परिश्रम करून प्रेतास बाहेर काढण्यात यश मिळविले रोहन आणि रोहित हे दोघेही अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतानाच खेळामध्ये आपल्या कामगिरीने नाव कमावत होते आई वडील मिस्त्री काम करून पोट भरतात खेळात आणि शिक्षणात या दोघांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे या दोघांच्या मृत्युने महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रावर तसेच वडमारे परिवारावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्राने या दोघांच्या जाण्याने दोन उत्कृष्ट खेळाडू गमावले आहेत
टिप्पण्या