किनगावात रस्त्याची दुरावस्था , नेमकं जबाबदार कोन ?
किनगावात मुख्य रस्त्याची दुरावस्था , नेमकं जबाबदार कोन ?
त्रिशरण वाघमारे
किनगावच्या मुख्य रस्त्यावरच खड्डे पाण्याने सतत भरलेले असल्याने पायी चालणाऱ्या नागरीकांची तारांबळ उडताना दिसते. तसेच वाहणे सुद्धा रस्त्याच्या कडेला लावुन वाहनचालक बिनधास्त गप्पा मारत बसलेले दिसतात . याचा त्रास मात्र सामान्य नागरीकांना सोसावा लागत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की अहमदपुर तालुक्यातील किनगाव मोठी बाजारपेठ म्हणुन ओळखले जाते . तीन जिल्हयातील व्यापारी आणि पंचक्रोशीतील नागरीक येथे खरेदीसाठी येत असतात . भविष्यात किनगावला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणुन इथल्या नेते मंडळींनी तसा प्रस्तावही प्रशासनाकडे पाठवलाय , परंतु 548 महामार्गाच्या विकासकामाला सुरु झाल्यापासुन किनगावचा चेहरा मोहरा बदललेला दिसतोय . सावरकर चौक येथे रस्त्याचे अर्धवट काम त्यामुळे उडणारी धुळ आणि आजुबाजुला राहणाऱ्या नागरीकांनी घरातील सोडलेले सांडपाणी नाल्या नसल्याने मुख्य रस्त्यावर आल्याने रस्त्यात साचलेली डबकी त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहणामुळे अंगावर चिखल उडतो की काय म्हणुन अंग चोरुन चालणारा नागरीक . त्यामुळे भविष्यात किनगाव तालुका झाले तर शोभुन दिसेल का ? किनगावची ही अवस्था बदलेल का? या अवस्थेला नेमकं कोण जबाबदार , नागरीक की प्रशासन ? ही प्रश्न खरंतर अंतमुख करायला लावणारी आहेत
टिप्पण्या