विना पंचनामा एकरी पंचविस हजार मदत देण्यात यावी
*एकरी २५ हजार विना पचंनामा, विना पहाणी सरसकट अतिवृष्टी मदत जाहिर करा* - काॅ.अर्जुन आडे
अरविंद राठोड
किनवट :किसान सभा, शेतकरी व शेतकऱ्यांच्या पोरांची बैठक इस्लापुर येथे नुकतीच संपन्न झाली.
गेल्या दिवासांपासुन परीतिच्या पाउसाने प्रचंड नुकसान केले आहे.शेती पिके उदध्वस्त झाले आहेत.हाता तोंडाला आलेले सोयाबीन कापूस ,मका इत्यादी पिके जाग्यावर कुजून कोंबे फुटली आहेत.
परिणामी शेतकरी आणि शेतीवर अवलबूंन असलेले शेतमजूर असामाणी सुलातांनी सकंटातुन जात आहेत. राज्य सरकार तात्काळ मदत जाहीर करायचे सोडून, पहाणी दोरे ,पंचनामा इत्यादी गोष्टी करत आहेत. तात्काळ पंचनामा न करात, पहाणी चे सोंग न घेता, शेतकऱ्यांना एकरी २५ हजार अतिवृष्टी मदत जाहिर करा असे मत बैठकीत काॅ.अर्जुन आडे यांनी केले.
या बैठकीत एकरी २५ हजार ओला दुष्काळ मदत जाहिर करा, पिक विमा कंपण्या कडून पिक विमा वाटप करा, खरीप हंगामात अद्याप हि निकाली न निघालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पिक कर्ज निकाली काढा, शेतीवर अवलबूंन असलेल्या मजुरांना रोजागरा हामी योजेने अंतर्गत रोजगार द्या या मागण्या घेऊन, २८ अक्टोंबर ला निर्णायक बेमुदत डपड ठोको-रास्ता रोकों आंदोलन इस्लापुर राज्यमहामार्गावर करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
या वेळी शेतकरी व शेतकऱ्यांच्या तरुन मुलांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी तयारीला लागले आहेत.
यावेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी काॅ.अर्जुन आडे होते,तर जेष्ठ शेतकरी करेवाड काका,व्यवारे काका,खंडेराव कानडे,स्टॅलिन आडे, तानाजी राठोड, राम कंडेल,इरफाम पठाण,जनार्दन काळे, राहुल राठोड, शिवाजी किरवले,आनंद लब्हाळे ,विशाल आडे ,मोहन जाधव, योगीराज जाधव,दिलीप जाधव इत्यादी शेतकरी व शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
बेमुदत डपड ठोको- रास्ता रोकों आंदोलन २८ अक्टोबंर रोजी इस्लापुर,ता.किनवट राज्य माहामार्गावर करण्याचा इसारा देण्यात आला आहे.
टिप्पण्या