प्रगतीचा निधी वळवला जात असल्याने हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा कारावा.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एन.डी.एम.जे संघटनेची मागणी

*प्रगतीचा निधी वळवला जात असल्याने हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा कारावा*

*सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एन.डी.एम.जे संघटनेची मागणी*


अहमदपूर (संजय कांबळे माकेगावकर)दि.मागील काही दिवसात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अखर्चित निधी इतरत्र वळवला जात असल्याने महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड चीड व आक्रोश असल्याचे जाणवत असतानाच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सोलापूर दौऱ्यावर येताच त्यांना पुरोगामी संघटनांच्या रोषास व रोगास सामोरे जावे लागले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा बौद्ध, दलित आदिवासिंच्या प्रगतीचा निधी सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामीण विकास विभाग या विभागाकडे वळवला असल्याचे लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी धनंजय मुंडे यांना पुराव्यानिशी दाखवुन दिले.
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते,माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास (दादा) धाइंजे यांचे नेतृत्वाखाली नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव लोकप्रिय नेते वैभव गिते, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,संभाजी साळे यांच्या शिष्टमंडळाने धनंजय मुंडे यांची माळीनगर शासकीय विश्रामगृह येथे रात्री 11 वाजता भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.
निवेदनातील प्रमुख मागण्या
1)बौद्ध अनुसूचित जाती,जमातींच्या हक्काचा निधी इतर विभागांकडे वळवू नये अखर्चित ठेवू नये म्हणून येत्या हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा मंजूर करावा
2)अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत खून,बलात्कार,जाळपोळ,सामुदायिक हल्ला झालेल्या पीडितांना अनुदान देण्यासाठी 72 कोटी रुपये तरतूद वितरित करावी
3)मिनी ट्रॅक्टरच्या योजनेसाठी 62 कोटी रुपये तरतूद वितरित करावी
4)दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत बदल करून बागायती एकरी जमिनीसाठी 20 लाख रुपये तर जिरायतीसाठी 15 लाख रुपये तरतूद करावी.
5)मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार व दक्षता नियंत्रण समितीची स्थापना करावी.
6)बौद्ध,अनुसूचित जातीच्या नागरिकांनी मुद्रा योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे.
7)महाराष्ट्रातील जातीय अत्याचारात खून झालेल्या कुटुंबांचे शासकीय नोकरी,जमीन,पेंशन देऊन पुनर्वसन करावे.यासाठी आकस्मिकता योजना लागू करावी.
8)खर्डा जि.अहमदनगर येथील नितीन आगे खून खटल्यातील फिर्यादी राजू आगे यांना खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत पोलीस संरक्षण द्यावे.
9)शिर्डी जि.अहमदनगर सागर शेजवळ हत्या प्रकरणी आरोपींचा पॅरोल रद्द करावा.इत्यादी मागण्यांसाठी  नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)संघटना आक्रमक होती.सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांनी त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे,एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गिते राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर,पंचायत समिती सदस्य अजय सकट,माळीनगर सरपंच अभिमान जक्ताप,शिवसेनेचे नेते बाबासाहेब बंडगर,पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवान भोसले, तालुका उपाध्यक्ष संभाजी साळे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे