भारतीय बौद्ध महासभा लातुर च्या वतीने अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

*भारतीय बौद्ध महासभा लातूर च्या वतीने अशोक विजयी दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा* 
लातूर :- भारतीय बौद्ध महासभा जिल्हा, तालुका व शहर शाखेच्या वतीने अशोक विजयादशमी दिनानिमित्त व 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे अभिवादन करण्यात आले यावेळी धम्म संस्थेच्यावतीने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पू. भंते यश कश्यपायन, जिल्हाध्यक्ष प्रा बापूसाहेब गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अर्जुन कांबळे, शहराध्यक्ष कुंदन गायकवाड, केंद्रीय शिक्षिका आशाताई चिकटे, जिल्हा सचिव महिला विभाग मंगलताई सुरवसे, शहर सचिव महिला विभाग रेखाताई सुरवसे, तालुका सरचिटणीस प्रा. जीवन गायकवाड, अशोक शिंदे गुरुजी यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण केले.
 यावेळी त्रिशरण, पंचशील, भीम स्मरण, भीम स्तुती विधी बौद्धाचार्य दत्तात्रय भोसले, नानासाहेब आवाड, बौद्धाचार्य देवदत्त बनसोडे यांनी घेतले तसेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा वाचन लातूर तालुका संस्कार विभाग प्रमुख प्रेमनाथ कांबळे यांनी उपस्थितांना दिल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व उपस्थितांना जिल्हाध्यक्ष प्रा. बापूसाहेब गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे आभार जिल्हा सचिव संरक्षण विभाग अभिमान्यू लामतुरे यांनी मानले तर सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अर्जुन कांबळे यांनी केले या कार्यक्रमाची सांगता 'सरणतय' या गाथेने करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभा, लातूर जिल्हा, तालुका, शहर या धम्म संस्थेचे सर्व पदाधिकारी व उपासक-उपासिका, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे