वल्लभभाई पटेल शेतकऱ्यांचे सरदार - गणेश दादा हाके पाटील
*वल्लभभाई शेतकऱ्यांचे सरदार होते*
गणेश हाके
अहमदपूर : भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांचे नेतृत्व केले वल्लभभाई शेतकऱ्यांचे सरदार होते असे उद्गार भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश दादा हाके पाटील यांनी येथे काढले सरदार वल्लभभाई पटेल यांचे 145 व्या जयंतीनिमित्त बालाघाट तंत्रनिकेतन येथे आयोजित जयंती संमारंभात ते बोलत होते
स्वातंत्र्यलढ्यात वल्लभभाई ची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती परंतु स्वातंत्र्यानंतर देशाततील सर्व संस्थाने खालसा केली हैदराबाद संस्थान खालसा करण्यासाठी लष्करी कारवाई करून हैदराबाद संस्थान ताब्यात घेतले व अखंड भारताचे स्वप्न साकार केले त्यांच्या या योगदानाबद्दल प्रत्येक भारतीयाने कृतज्ञ असले पाहिजे असे मत यावेळी श्री हाके यांनी व्यक्त केले.
यावेळी श्री हाके यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली.
यावेळी प्राचार्य डॉ एन.पी. शिवपूजे,उपप्राचार्य एस.बी. नागरगोजे, आरदवाड एम.एन., दहिटनकर एस.बी.,कोपनर एस.टी., लातुरे एस.बी.,कांबळे बी.एन.,नरहरे ए. पी.,लोणकर आर.एच.,शेख टी. जे.,स्वामी एम.व्ही.,श्रीमती पुणे ए.डी., श्रीमती मेनकुदळे एस. के., नंदागवळे एन.एल.,यमगिर जी.डी., कुलकर्णी व्ही.एच.,केंद्रे एस.के.
आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते
टिप्पण्या